SBI YONO 20under20 अॅवाॅर्डच्या नामांकनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर

परीक्षक सोहा अली खान म्हणाल्या, ' YONO SBI 20under20 पुरस्काराची परीक्षक असणं हा एक सुखद अनुभव. खरोखर अद्वितीय, वेगळं काम करणारे इथे दिसले. मला वाटतं प्रत्येक भारतीयानं त्यांच्या आवडत्या नाॅमिनीला मत द्यावं '

News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2019 06:34 PM IST

SBI YONO 20under20 अॅवाॅर्डच्या नामांकनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर

भारताची सर्वात मोठी बँक असलेली द स्टेट बँक आॅफ इंडियानं नव्या युगाची YONO ही डिजिटल बँक सुरू केली आहे. YONO तुमच्या बँकिंग आणि जीवनावश्यक गरजा एकाच छताखाली पूर्ण करते. YONOमुळे तुम्हाला डिजिटल बँकिंग प्लॅटफाॅर्म मिळतो.

YONO अशा नव्या ग्राहकांना आकर्षित करते ज्यांना स्वत:च्या सोयीनं डिजिटल प्लॅटफाॅर्म वापरायचा असतो.

YONOनं आपली वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी आणि अनेक क्षेत्रात यशस्वी ठरणाऱ्या तरुण पिढीसोबत राहण्यासाठी SBIनं YONO SBI 20under20 ही नवी संकल्पना आणली आहे.

यामध्ये 20 वर्षाखालील ( स्त्री-पुरुष ) आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या 20 तरुण-तरुणींना पुरस्कार दिले जाणार आहेत. त्या कॅटेगरीज पुढीलप्रमाणे -

स्टुडंट अॅचिव्हर, अभिनेता, खेळाडू, कला आणि साहित्य, निर्विवाद गेम चेंजर, सोशल मीडिया इन्फ्लुन्सर, परफाॅर्मिंग आर्टिस्ट, यशस्वी दिव्यांग, Global Indian and Sustainability Pioneer.

Loading...

यापैकी महाराष्ट्रातले 11, गोव्याचा 1 आणि गुजरातमधून 2 अशांना नामांकनं मिळाली आहेत. एकूण पश्चिम भारतातून 14 जणांना नामांकनं आहेत.

SBI प्रवक्ते म्हणाले, ' YONO SBI 20under20 पुरस्कार हा YONOची वर्षपूर्ती साजरी करणं, SBIच्या नव्या डिजिटल बँकेनिमित्त आणि अनेक क्षेत्रात यशस्वी ठरणाऱ्या तरुण पिढीसोबत राहण्यासाठी सुरू केलाय.'

परीक्षकांनी 60 जणांना नामांकनं दिली आहेत. या परीक्षकांमध्ये नॅशनल पेमेंट्स काॅर्पोरेशन आॅफ इंडियाचे प्रमुख दिलीप आसबे, मायक्रोसाॅफ्ट इंडियाचे कार्यकारी संचालक शशी श्रीधरन, पालो अल्टो,फेसबुकचे माजी संचालक आनंद चंद्रशेखरन, अभिनेत्री आणि लेखिका सोहा अली खान, युनायटेड नेशनच्या पर्यावरणाची राजदूत दिया मिर्झा, सोशल मीडिया इन्फ्लुसर मल्लिका दुआ आणि क्रीडा पत्रकार आणि लेखक बोरिआ मुजुमदार असे दिग्गज आहेत.

नाॅलेज पार्टनर KPMG यांनी नामांकनाची यादी बनवलीय. शिवाय YONO SBI 20under20 पुरस्कारात भारताची एंगेजमेंट आणि कंटेंट एजन्सी द नेटवर्कचाही सहभाग आहे.

परीक्षक सोहा अली खान म्हणाल्या, ' YONO SBI 20under20 पुरस्काराची परीक्षक असणं हा एक सुखद अनुभव. खरोखर अद्वितीय, वेगळं काम करणारे इथे दिसले. मला वाटतं प्रत्येक भारतीयानं त्यांच्या आवडत्या नाॅमिनीला मत द्यावं '

महाराष्ट्रातून नामांकन मिळालेले आहेत- अनुषा सुब्रम्हण्यम, कला आणि साहित्य - स्त्री; सान्या रुनवाल, कला आणि साहित्य - स्त्री, रुहानिका धवन; सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - स्त्री; स्पर्श खंचांदानी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ; फैझल खान, सर्वोत्कृष्ट अभिनेता - पुरुष ; पार्थ भालेराव, सर्वोत्कृष्ट अभिनेता - पुरुष; सनी पवार, सर्वोत्कृष्ट अभिनेता- पुरुष; अंजली गायकवाड, परफाॅर्मिंग आर्टिस्ट - स्त्री; राजवी गांधी, सोशल मीडिया इन्फ्लुन्सर - स्त्री; रीम शेख, सोशल मीडिया इन्फ्लुन्सर - स्त्री; पृथ्वी शाॅ, स्पोर्ट चँपियन - पुरुष.

गोव्याचा एकमेव नाॅमिनी आहे झुलेकिया ज्युलिएट अँटाओ, तिला Sustainability Pioneer-female विभागात नामांकन आहे. गुजरातमधून नाॅमिनी आहेत - निशांत अभांगी, स्टुडंट अॅचिव्हर - पुरुष; 15 वर्षांचा हर्षवर्धन झाला, गेम चेंजर - पुरुष.

या सगळ्या यशस्वी तरुण-तरुणींकडे प्रचंड इच्छाशक्ती आणि अफाट उर्जा आहे. ते SBIच्या YONO या डिजिटल बँकेशी संबंधितांशी जोडले जातायत. तेव्हा तुमचं बहुमूल्य मत ( ) द्या आणि भारताच्या तरुण अॅचिव्हर्सना प्रोत्साहन द्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2019 05:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...