देवा! खात्यातून काढत होता कोणा दुसऱ्याचे पैसे, म्हणाला- मला वाटलं मोदींनी अकाऊंटमध्ये टाकले

देवा! खात्यातून काढत होता कोणा दुसऱ्याचे पैसे, म्हणाला- मला वाटलं मोदींनी अकाऊंटमध्ये टाकले

अकाऊंट नंबर एकच आहे पण खातेधारक दोन आहेत. बँकेकडून दोघांनाही पासबूक देण्यात आलं आहे. त्यात धारकांचे नंबरही लिहिण्यात आले आहे. पण यानंतर जे काही झालं ते वाचल्यानंतर तुम्ही हादरला.

  • Share this:

मध्यप्रदेश, 21 नोव्हेंबर : मंडळी, देशात सध्या सगळं अजब-गजब सुरू आहे. एकीकडे राजकीय वातावरण गरम आहे तर दुसरीकडे महागाईमुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. अशात अवकाळी पावसामुळे देशातील शेतकऱ्यांवर पीक संकट ओढवलं. हे कमी की काय म्हणून ज्यांच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला त्या बँकसुद्धा दगा देतायत. त्यामुळे देशातला प्रत्येक व्यक्ती हैराण आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया एका शाखेत दोन व्यक्तींच्या नावावर एकच अकाऊंट नंबर आहे. त्यामुळे जो काही गोंधळ झाला आहे. यावर तुमचा विश्वासही बसणार नाही.

अकाऊंट नंबर एक आणि खातेधारक दोन

हो, अकाऊंट नंबर एकच आहे पण खातेधारक दोन आहेत. बँकेकडून दोघांनाही पासबूक देण्यात आलं आहे. त्यात धारकांचे नंबरही लिहिण्यात आले आहे. पण यानंतर जे काही झालं ते वाचल्यानंतर तुम्ही हादरला. एका धारकाने अकाऊंटमध्ये पैसे टाकले. दुसऱ्या धारकाने ते काढून घेतले. आणि असं एकदा नाही वारंवार होत राहिलं. पण त्यांतर या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

एका खातेधारकाने पैसे टाकले की दुसरा खातेधारक ते पैसे काढून घ्यायचा. बरं सरकार आपल्या खात्यात पैसे टाकत आहे असं समजून तो पैसे काढायचा अशी माहिती समोर आली आहे. तब्बल 6 महिन्यांपर्यंत हा प्रकार सुरू होता. यात 89 हजार रुपये खात्यातून काढण्यात आले. मध्यप्रदेशच्या भिंड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे ज्याची आता जगभर चर्चा सुरू आहे.

इतर बातम्या - मुलीच्या LOVE STORY चा आईनेच केला 'दि एन्ड', जिवंत जाळून कायमचं संपवलं!

आलमपुरमध्ये रुराई गाव आहे. इथे हुकुम सिंह नावाचे व्यक्ती राहतात. त्यांनी एसबीआयच्या आलमपूर शाखेत खाते उघडले. 12 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांना पासबुक मिळालं. यानंतर ते हरियाणा इथे गेले. तिथे राहून ते पैसे कमवायचे आणि बँकेत ठेवायचे. 16 ऑक्टोबर 2019 रोजी ते गावात परतले. यावेळी खात्यातून पैसे काढण्यासाठी गेले असता खात्यातून आधीच 89 हजार रुपये काढल्याचं समोर आलं.

हुकुम सिंह यांनी तातडीने एसबीआयचे शाखा व्यवस्थापक राजेश सोनकर यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली. तपासणी केल्यावर असं दिसून आले की, 2 लोकांना समान खाते नंबर देण्यात आला आहे.  या खात्याचा दुसरा मालक रोनी गावचा हुकुम सिंह बघेल आहे. 23 मे 2016 रोजी बघेल यांना पासबुक देण्यात आलं होतं.

इतर बातम्या - 'रड्या ऑफ द ईयर अवार्ड संज्यालाच दिला पाहिजे'

त्यानंतर बँकेने दोन्ही हुकुम सिंह यांना बँकेत बोलावलं. हुकुम सिंह बघेल म्हणाले की, पैसे काढण्यासाठी ते आधार कियोस्क सेंटरमध्ये जात असत आणि बायोमेट्रिक मशीनमध्ये अंगठा ठेवून पैसे काढत असत. त्यानंतर बघेल यांची चौकशी करण्यात आली की, जर तुम्ही बँकेत पैसे टाकत नव्हता तर बँकेतून पैसे का काढले. त्यावर, 'मला वाटलं की मोदी सरकार माझ्या खात्यात पैसे टाकत आहे. त्यामुळे मी पैसे काढले' असं उत्तर त्यांनी दिलं.

त्यानंतर बँकेने हुकुम सिंह बघेल हे तीन आठवड्यात हुकुम सिंह यांना 89 हजार रुपये परत करतील असं कागदावर लिहून घेण्यात आलं. आपण हुकुम सिंह यांना पैसे परत करू असं आश्वासन बहेल यांनी बँकेला दिलं आणि कागदावर सही केली. त्यानंतर कुठे हे प्रकरण शांत झालं.

इतर बातम्या - शिक्षकाने तरुणीला पाठवला अश्लील मेसेज, मनसेनं अर्धनग्र धिंड काढत शिकवला धडा!

Published by: Renuka Dhaybar
First published: November 21, 2019, 6:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading