मुंबई, 24 मे : स्टेट बँक ऑफ इंडियानं स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवलेत. ही पदं रेग्युलर आणि काॅन्ट्रॅक्ट दोन्ही पद्धतीनं भरली जाणार आहेत. ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना 15 लाख ते 52 लाखापर्यंत पगार मिळू शकतो.
तुम्हाला बँकेतली नोकरी हवी असेल तर ही उत्तम संधी आहे. त्यासाठी तुम्ही www.sbi.co.in इथे माहिती मिळवू शकता. इथे लिखित परीक्षा नाही, फक्त इंटरव्ह्यूवर निवड होईल. 12 जूनपर्यंत अर्ज करा.
तुम्ही ग्रॅज्युएट आहात? मग 'इथे' मिळेल 44,900 रुपये पगाराची नोकरी
अर्जाची फी
सर्वसामान्यांसाठी 600 रुपये, आरक्षित वर्गासाठी 100 रुपये
अशी होईल निवड
उमेदवाराची निवड इंटरव्ह्यूनं केली जाईल. समजा दोन उमेदवारांना इंटरव्ह्यूमध्ये सारखे गुण मिळाले तर जास्त वयाच्या उमेदवाराची निवड होईल.
इथे ऑनलाइन करा गुंतवणूक, सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त मिळेल व्याज
असा करा अर्ज
तुम्ही SBIच्या आॅफिशियल वेबसाइट www.sbi.co.in वर जा
तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती भरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा
राज्यात सेना – भाजपच्या विजयाची ही आहेत सहा कारणं
तुमचा पासपोर्ट साइज फोटो आणि साइन यांना स्कॅन करून अपलोड करा
पूर्ण डिटेल्स भरून अर्जाचा फाॅर्म भरा
नंतर अर्जाची फी भरा
अर्ज करण्यासाठी लिंक - https://ibpsonline.ibps.in/sbisrcojan19/reg_start.php
मोदी त्सुनामीपुढे विरोधकांचं पानिपत, यासोबत महत्त्वाच्या इतर 18 घडमोडी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.