मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

SBI Recruitment 2021: लवकरच होणार परीक्षा; जाणून घ्या कशी असेल निवड प्रक्रिया

SBI Recruitment 2021: लवकरच होणार परीक्षा; जाणून घ्या कशी असेल निवड प्रक्रिया

sbi

sbi

आज आम्ही तुम्हाला या परीक्षेचं स्वरूप (Exam pattern) कसं असणार आहे आणि निवड प्रक्रिया (SBI selection process) कशी असणार आहे हे सांगणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 01 ऑगस्ट: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 6100 अप्रेन्टिस पदांच्या (SBI Apprentis Recruitment 2021) भरतीसाठी 26 जुलै 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता, SBI अप्रेंटिस भरती 2021 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी बँक ऑनलाइन परीक्षा (Online Exam) घेणार आहे. SBI अप्रेंटिस परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वच उमेदवार या  तयारीला लागले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या परीक्षेचं स्वरूप (Exam pattern) कसं असणार आहे आणि निवड प्रक्रिया (SBI selection process) कशी असणार आहे हे सांगणार आहोत.

परीक्षेसाठी प्रवेशपत्रं (SBI admit card) लवकरच अधिकृत वेबसाइट bank.sbi/careers किंवा sbi.co.in वर अपलोड केली जाऊ शकतात. उमेदवार स्टेट बँकेच्या https://nsdcindia.org/apprenticeship किंवा https://apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड/जन्मतारीख टाकून SBI अप्रेन्टिस प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.

हे वाचा - आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई इथे पदभरती; 'या' पदांसाठी करा अर्ज

असं असेल परीक्षेचं स्वरूप

सामान्य/आर्थिक जागरूकता, सामान्य इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड, रीझनिंग एबिलिटी आणि कंप्यूटरसह चार विभाग असतील. प्रत्येक विभागात 25 गुणांचे 25 प्रश्न असतील. अशा प्रकारे, एकूण 100 गुणांची परीक्षा होईल. ज्यासाठी 1 तास दिला जाईल. पर्यायी प्रश्नांमध्ये चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण दिले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी, प्रश्नाचे 1/4 गुण कापले जातील. सामान्य इंग्रजीच्या परीक्षेव्यतिरिक्त प्रश्न द्विभाषिक अर्थात इंग्रजी आणि हिंदीमध्ये असतील.

अशी होणार निवड

ऑनलाईन परीक्षेचा निकाल बँकेच्या वेबसाइटवर अपलोड केला जाईल. गुणवत्ता यादी राज्यनिहाय आणि श्रेणीनिहाय तयार केली जाईल. परीक्षेत पात्र उमेदवारांना संबंधित राज्य आणि श्रेणींमध्ये त्यांच्या एकूण गुणांच्या क्रमानं ठेवले जाईल. ऑनलाईन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना स्थानिक भाषा परीक्षेला उपस्थित राहावं लागेल.

First published:

Tags: Career, Exam, Job, SBI