S M L

SBI च्या ‘या’ SMSकडे दुर्लक्ष केलंत तर ब्लॉक होऊ शकतं तुमचं अकाउंट

देशातील सगळ्यांत मोठी सरकारी बँक एसबीआय (स्‍टेट बँक ऑफ इंडिया ) त्यांच्या ग्राहकांना एकच SMS सतत पाठवत आहे. पण या एसएमएसकडे दुर्लक्ष करू नका. त्यामुळे तुमचंच नुकसान होणार आहे. काय आहे हा SMS आणि SBIच्या ग्राहकांनी काय करणं आवश्यक आहे?

Updated On: Sep 8, 2018 02:09 PM IST

SBI च्या ‘या’ SMSकडे दुर्लक्ष केलंत तर ब्लॉक होऊ शकतं तुमचं अकाउंट

मुंबई, ८ सप्टेंबर : देशातील सगळ्यांत मोठी सरकारी बँक एसबीआय (स्‍टेट बँक ऑफ इंडिया ) त्यांच्या ग्राहकांना एकच SMS सतत पाठवत आहे. या एसएमएसमध्ये बँक त्यांच्या ग्राहकांना केवायसी (Know Your Customer) पूर्ण करण्याचा आग्रह केला आहे. जर लवकरात लवकर केवायसी पूर्ण नाही केली तर तुम्ही तुमच्या अकाऊंट मधून कोणतेही व्यवहार करू शकणार नाही. प्रत्येक ग्राहकाला बँकेत जाऊन केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. आरबीआयने (रिजर्व बँक ऑफ इंडिया) सगळ्या बँक अकाऊंटसाठी केवायसी अनिवार्य केल्याने एसबीआयला हे पाऊल उचलावं लागलंय.

तुमचं बँक अकाऊंट सुरक्षित रहावं यासाठी बँकने केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे.

जर तुम्ही याआधी केवायसी पूर्ण केली असेल तरी देखील तुम्हाला आता पुन्हा ते अपडेट करावा लागणार आहे.  त्यामुळे बँकेकडून आलेल्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 8, 2018 01:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close