स्टेट बँकेच्या ग्राहकांना खूशखबर, गृहकर्जाच्या व्याजदरात कपात

स्टेट बँकेच्या ग्राहकांना खूशखबर, गृहकर्जाच्या व्याजदरात कपात

गृहकर्जात एसबीआयने 0.25 टक्क्यांची तर 30 लाखांपेक्षा जास्त कर्जात 0.10 टक्क्याने कपात केलीये.

  • Share this:

08 मे : भारतीय स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांना दिलासा दिलाय. गृहकर्जात एसबीआयने 0.25 टक्क्यांची कपात केलीये. तर 30 लाखांपेक्षा जास्त कर्जात 0.10 टक्क्याने कपात केलीये.

नोटबंदीनंतर रिअल इस्टेट क्षेत्रात कमालीचे बदल दिसून आहे.  घरांच्या किंमतीत मोठी कपात झाली. बँकांनीही घरखरेदीसाठी गृहकर्जाचे दर कमी केले होते. आता एसबीआयने ग्राहकांनी आणखी एक दिलासा देत 0.25 टक्क्याने कपात केलीये.

तीस लाखांपेक्षा कमी कर्ज असलेल्यांसाठी 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आलीये. त्यामुळे  आता 30 लाखांपेक्षा कमी कर्जाचा व्याजदर 8.35 टक्के असणार आहे. तर 30 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांच्या व्याज दरात 0.10 टक्क्यांची कपात करण्यात आली असून  आता गृहकर्जाचा नवे दर 8.35 टक्के असणार आहे. एसबीआयच्या या निर्णयामुळे इतर बँकाही दर कमी करतात का हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2017 04:08 PM IST

ताज्या बातम्या