मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

SBI मध्ये खातं असेल तर हे वाचा! 30 जूनपूर्वी ही कागदपत्रं हवीत अन्यथा...

SBI मध्ये खातं असेल तर हे वाचा! 30 जूनपूर्वी ही कागदपत्रं हवीत अन्यथा...

sbi

sbi

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आपल्या ग्राहकांना (SBI Alert) नोटीस बजावली आहे.

नवी दिल्ली, 5 जून: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक  बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आपल्या ग्राहकांना (Customer ) नोटीस बजावली आहे. बँकेने या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 30 जून पर्यंत पॅन आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याच्या  खातेदारांना सूचना दिल्या आहेत. आधार  (Aadhar card) आणि पॅन कार्ड (PAN card) लिंक न करून घेतल्यास  बँकेच्या चालू सेवांवर याचा परिणाम होईल, असंही बँकेकडून सांगण्यात आलंय.

SBIने ट्विट करून ग्राहकांना आधार कार्ड (Aadhar card) आणि पॅन कार्ड (Pan card link) लिंक करणं अनिवार्य असल्याचं सांगितलंय. जर पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक केले नाही तर PAN इनअॅक्टिव्ह (Inactive) होतील आणि ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी येतील. त्यामुळे अखंडित सेवा घेण्यासाठी पॅन आणि आधार कार्ड लिंक करणं गरजेचं  आहे, असंही ट्विटमध्ये म्हटलंय. पॅनला आधार कार्डसोबत लिंक करण्याची शेवटची तारीख (Last date) 30 जून आहे.

पॅन हा इनकम टॅक्स डिपार्टमेंटने (Income Tax Department) दिलेला विशिष्ट दहा-अंकी क्रमांक आहे. पॅन नंबर हा एखाद्या व्यक्तिने कर चुकवू नये, यासाठी दिला जातो. पॅन कार्डच्या माध्यमातून इनकम टॅक्स डिपार्टमेंटला टॅक्सच्या बाबतीतील सर्व मोठ्या व्यवहारांची तपशीलवार नोंद मिळते.

RBI ची मोठी घोषणा: Bank Holiday असेल तरी तुमचा पगार, पेन्शन नाही खोळंबणार

जर ग्राहक पॅन कार्ड आधारशी जोडण्यात अयशस्वी ठरले तर ते इनअॅक्टिव्ह केले जाईल, असा इशारा बँकेने ग्राहकांना दिलाय. तसेच बँकेचे इतर व्यवहार करण्यासाठीही ग्राहकांना अडचणी येतील.

अधिकाऱ्यांनी आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी  www.incometaxindiaefilling.gov.in ही लिंक देखील शेअर केली आहे. या वेबसाईटवरून खातेदार त्यांचे पॅन आणि आधार कार्ड अगदी सहज लिंक करू शकतात. याची प्रक्रियादेखील खूप सोपी आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर खातेदारांना डाव्या बाजूला दिलेल्या 'लिंक आधार' या ऑप्शनवर क्लिक करून डिटेल्स भरता येतील.

पॅन-आधार लिंक करण्यासाठी शेवटची तारीख 30 जून आहे. दिलेल्या मुदतीत आधार-पॅन लिंक न केल्यास बँकिंग सेवेत अडचणी येतील किंवा लेट फी आकारली जाईल.

यापूर्वी 31 मार्च ही शेवटची तारीख देण्यात आली होती. मात्र, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सकडून तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे तुम्हीही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केले नसेल तर 30 जूनपूर्वी करून घ्या. अन्यथा तुम्हाला पॅन कार्ड वापरण्यासह बँकेचे व्यवहार करण्यात अडचणी येतील.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card link, SBI, Sbi alert