मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /'संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा, नाहीतर...' नामांतरावर शरद पवारांनी अखेर मौन सोडलं!

'संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा, नाहीतर...' नामांतरावर शरद पवारांनी अखेर मौन सोडलं!

शरद पवारांच्या या विधानानंतर पुन्हा राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

शरद पवारांच्या या विधानानंतर पुन्हा राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

शरद पवारांच्या या विधानानंतर पुन्हा राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

औरंगाबाद, 15 जानेवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामकरणाबाबत एकमत नाही. परिणामी विरोधकांनीही हा मुद्दा लावून धरला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नामांतराच्या विषयावर सुरू असलेल्या वादात पहिल्यांदाच आपलं मत व्यक्त केलं आहे. ( Sharad Pawar finally broke his silence )

शरद पवार (Sharad Pawar) यावेळी म्हणाले की, आमच्यात काही वाद नाही. संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा, नाहीतर अजून काही म्हणा..या प्रकरणाकडे मी गांभीर्यानं बघत नाही. त्यामुळे मी कधीही भाष्य केलं नाही.

हे ही वाचा-काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले, फोडली एकमेकांची डोकी!

उद्धव ठाकरे काय म्हणालेत..

CMO Twitter द्वारे औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला, याबाबत उद्धव ठाकरेंना विचारलं असता ते म्हणाले की, त्यात नवीन काय केलं? जे वर्षानुवर्षे बोलत आलो आहोत, तेच बोलणार आणि स्वीकारणार...यावेळी त्यांना काँग्रेसने व्यक्त केलेल्या नाराजीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. ( Sharad Pawar finally broke his silence ) त्यामुळे अजेंड्यात धर्मनिरपेक्षा हा शब्द आहे, त्यात औरंगजेब बसत नाही.

महाआघाडी सरकारच्या अजेंड्यावर हा विषय नाही, असं म्हणत काँग्रेसने नामांतरला त्यांचा विरोध स्पष्ट केल्यानंतरही शिवसेनेकडून संभाजीनगर असा उल्लेख शासकीय पातळीवर होत राहिला आहे. त्यावरून मुख्यमंत्र्यांना छेडलं असता, उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच या वादावर त्यांची भूमिका जाहीर केली. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असल्यानेच पुन्हा नामांतराच्या विषयाला हवा दिली जात आहे. नामांतरासाठी सरकारने नियुक्त केलेल्या समितीने नामांतराचा निर्णय घेतल्यास हा बदल होईल. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर (CMO Maharashtra) काँग्रेसच्या मंत्र्याच्या फोटोसह औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आणि यावरून पुन्हा आघाडीचं अंतर्गत वातावरण तापलं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी थेटपणे यावर राग व्यक्त करत संभाजीनगर उल्लेखावर आक्षेप नोंदवला.

First published:
top videos

    Tags: NCP, Sharad pawar, Udhav thackarey