मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /दोन शेजारणींचा जीव घेत स्वतःही विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न, असा झाला दुहेरी हत्याकांडाचा उलगडा

दोन शेजारणींचा जीव घेत स्वतःही विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न, असा झाला दुहेरी हत्याकांडाचा उलगडा

सावंतवाडी (Sawantwadi)  उभाबाजार येथे घडलेल्या दुहेरी खून प्रकरणाचा (Double Murder Case) अखेर पर्दाफाश झाला आहे.

सावंतवाडी (Sawantwadi) उभाबाजार येथे घडलेल्या दुहेरी खून प्रकरणाचा (Double Murder Case) अखेर पर्दाफाश झाला आहे.

सावंतवाडी (Sawantwadi) उभाबाजार येथे घडलेल्या दुहेरी खून प्रकरणाचा (Double Murder Case) अखेर पर्दाफाश झाला आहे.

कणकवली, 14 नोव्हेंबर: सावंतवाडी (Sawantwadi) उभाबाजार येथे घडलेल्या दुहेरी खून प्रकरणाचा (Double Murder Case) अखेर पर्दाफाश झाला आहे. बेपत्ता झालेला त्या युवकानेच खून केल्याची कबूली दिली आहे. दागिने चोरण्याच्या (stealing jewelery) हेतूनेच हे हत्याकांड झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे.

32 वर्षीय कुशल उर्फ विनायक नागेश टंकसाळी असं आरोपीचं नाव आहे. आरोपी दोन वेळा शहरातून बेपत्ता झाला होता. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी दिली आहे. हत्या प्रकरणात सहभागी असल्यानंच त्यानं भितीपोटी स्वतःला संपवण्याचा आणि पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा- नाशकात बसमध्ये घुसून कंडक्टर-ड्रायव्हरला दादागिरी, मारहाणीचा Video Viral

आरोपीनं सावंतवाडी शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांच्या चौकशीच्या भीतीने बेपत्ता होत विष प्राशन केलं होतं. त्यानंतर आरोपी पुन्हा एकदा नाट्यमयरित्या बेपत्ता झाला होता. मात्र पोलिसांनी अखेर त्याला अटक केली आहे. ठाणे येथून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. सावंतवाडीत आणल्यानंतर त्या तरुणाची येथील पोलीस ठाण्यात कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर चौकशीदरम्यान त्यानं हत्येची कबुली दिली आहे.

आरोपी कुशल हा मृत नीलिमा खानविलकर यांचा शेजारी असून पैशांची गरज असल्यानं दागिन्यांच्या हव्यासापोटी त्याने हे हत्याकांड केल्याचे उघड झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी याबाबतची माहिती दिली.

कशी झाली दुहेरी हत्या

सावंतवाडी शहरातील उभाबाजार परिसरात राहणाऱ्या नीलिमा खानविलकर आणि शालिनी सावंत यांचा गळ्यावर वार करून निर्घुण हत्या करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या खळबळजनक दुहेरी हत्याकांडानंतर जिल्हा पोलीस यंत्रणा तपासकामाला लागली होती. यात सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या टीम पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत होत्या.

हेही वाचा-  टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरवर युवराजचा निशाणा, विराट-अनुष्काचं Meme Share करत लगावला टोला

या प्रकरणात खून झालेल्या दोन्ही कुटुंबीयांची कसून चौकशी करण्यात आली तर खून झालेल्या कालावधीत त्या परिसरात कोण कोण वावरत होते. त्या खून झालेल्या घरात कोण कोण जाऊन आले त्यांची देखील पोलिसांनी कसून चौकशी केली होती. तसेच त्या दोघांनाही पोचवले जाणार्‍या जेवणाच्या डब्याचा वेळ याची देखील पोलिसांनी माहिती मिळवली.

या पार्श्वभूमीवर हत्येच्या तपासासाठी अनेक जणांची चौकशी सुरू असतानाच चौकशीसाठी बोलावलेल्या एका तरुणानं चौकशीच्या ससेमिर्‍याच्या भितीने बेपत्ता होत विषप्राशन केलं होतं. त्यावेळी त्याच्या पत्नीनं दिलेल्या बेपत्ताच्या तक्रारीनंतर पोलीसांनी त्याला वेंगुर्ला येथून ताब्यात घेतलं होतं. मात्र, विष प्यायल्यानं अत्यवस्थ असल्यानं त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून डॉक्टरच्या सल्ल्याने त्याला घरी पाठवण्यात आलं होतं. मात्र 9 नोव्हेंबर रोजी उशिरा तो पुन्हा नाट्यमयरित्या बेपत्ता झाला. त्यामुळे संशयाची सुई त्या तरुणाकडे वळली होती.

First published:
top videos

    Tags: Murder, Murder news