बचत आणि गुंतवणुकीसाठी महिलांची पसंती नेमकी कशाला? काय सांगतो सर्व्हे?

बचत आणि गुंतवणुकीसाठी महिलांची पसंती नेमकी कशाला? काय सांगतो सर्व्हे?

बचत आणि गुंतवणुकीचा विचार केला तर पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त सतर्क असतात. एका सर्व्हेनुसार, 58 टक्के महिलांना त्यांचे पैसे एफडी किंवा PPF मध्ये जमा करायचे असतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : बचत आणि गुंतवणुकीचा विचार केला तर पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त सतर्क असतात. एका सर्व्हेनुसार, 58 टक्के महिलांना त्यांचे पैसे एफडी किंवा PPF मध्ये जमा करायचे असतात. त्याचबरोबर तिसरा पर्याय म्हणजे त्या आपले पैसे सेव्हिंग अकाउंटमध्येच ठेवतात.

ऑनलाइन आर्थिक सेवा पुरवणाऱ्या स्क्रिपबॉक्सच्या सर्व्हेनुसार, 6 टक्के लोकांना सोन्याची खरेदी चांगली वाटते तर 15 टक्के लोक आपल्या उत्पन्नातला काही वाटा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्याला प्राधान्य देतात. हा सर्व्हे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत फेसबुक युजर्सना प्रश्न विचारून करण्यात आला. यामध्ये 400 महिलांनी भाग घेतला. यातल्या बऱ्याच जणी 80 आणि 90 च्या दशकांत जन्मलेल्या आहेत.

म्युच्युअल फंड आणि PPM ला प्राधान्य

या सर्व्हेनुसार, या मिलेनियल्स महिलांमध्ये तीन चतुर्थांश महिला बचतीचं समर्थन करतात. यामध्ये 16 टक्के महिला सुटीसाठी पैसे जमा करण्याचं लक्ष्य ठेवतात. ज्या महिला मिलेनियल्समध्ये नाहीत त्यांचा कल सेवानिवृत्ती किंवा मुलांच्या शिक्षणासाठी बचत आणि गुंतवणूक करण्याकडे असतो.

(हेही वाचा : उद्यापासून बदलणार बँकांचे नियम, तुमच्यावर होणार थेट परिणाम)

या वयोगटातल्या 33 टक्के महिलांसाठी PPF, LIC आणि एफडीमधली बचत महत्त्वाची आहे. 26 टक्के महिलांचं म्हणणं आहे, म्युच्युअल फंड लांब पल्ल्याची लक्ष्यं ठरवतात. 44 टक्के महिलांच्या मते, जेव्हा आपण आपली कष्टाची कमाई गुंतवणुकीत घालतो तेव्हा ती गुंतवणूक योग्य वेळी उपयोगी पडणंही महत्त्वाचं आहे.

स्क्रिपबॉक्सचे अशोक कुमार सांगतात, बचत आणि गुंतवणूक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन गोष्टींत फरक आहे. बचत संकटकाळात उपयोगी पडते. तर गुंतवणूक ही शिस्तबद्ध पद्धतीने संपत्ती निर्माण करण्याचा मार्ग आहे.

============================================================================================

पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान, सिंधुदुर्गातील स्थितीचा GROUND REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 05:18 PM IST

ताज्या बातम्या