S M L

सौदी अरेबियात महिलांनाही अखेर 'ड्रायव्हिंग'चं स्वातंत्र्य !

सौदी अरेबियातील महिलांना अखेर गाडी चालवण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. सौदीचे राजे सलमान यांनी आज हा आदेश काढला. जगभरातून सौदीच्या या निर्णयाचं स्वागत होतंय. तिथं गेली अनेक दशकं महिलांना गाडी चालवण्याचा अधिकार मिळावा म्हणून महिलांनी आंदोलनं चालवलं होतं.

Chandrakant Funde | Updated On: Sep 27, 2017 05:50 PM IST

सौदी अरेबियात महिलांनाही अखेर 'ड्रायव्हिंग'चं स्वातंत्र्य !

रियाध, 27 सप्टेंबर : सौदी अरेबियातील महिलांना अखेर गाडी चालवण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. सौदीचे राजे सलमान यांनी आज हा आदेश काढला. जगभरातून सौदीच्या या निर्णयाचं स्वागत होतंय. तिथं गेली अनेक दशकं महिलांना गाडी चालवण्याचा अधिकार मिळावा म्हणून महिलांनी आंदोलनं चालवलं होतं.

या लढ्यात अनेक महिलांना शिक्षेलाही सामोरे जावं लागलं होतं. महिलांनी गाडी चालवू नये अशी अलिखित प्रथाच सौदीत होती. 1990 मध्ये तर थेट कायदाच करून महिलांच्या ड्रायव्हिंगवर बंदी घालण्यात आली होती.

या कायद्यांतर्गंत गाडी चालवणाऱ्या शिक्षाही सुनावली जात असे. गाडी चालवणाऱ्या महिलांना शिक्षा करणारा सौदी अरेबिया हा जगातला एकमेव देश होता. त्यामुळे जगभरात सौदीची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून हळूहळू महिलांना अनेक हक्क दिले जात आहेत. वाहन चालवण्याचं स्वातंत्र्य हा त्यापैकी एक महत्त्वाचा बदल मानला जात आहे.

किंग सलमान आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रीय दिवसाच्या सोहळ्यात महिलांना रियाधमधील मुख्य स्टेडियममध्ये प्रवेश देऊन नवी सुरुवात केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 05:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close