Home /News /news /

सौदीच्या युवराजाने हॅक केला Amezonच्या जेफ बेझोस यांचा फोन, Whats App मधून पाठवला व्हिडिओ

सौदीच्या युवराजाने हॅक केला Amezonच्या जेफ बेझोस यांचा फोन, Whats App मधून पाठवला व्हिडिओ

अमेरिकी उद्योगपती आणि अॅमेझॉनचे (Amazon) सीईओ जेफ बेझोस (Jeff Bezos)यांचा फोन हॅक करण्यात आला. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी व्हॉट्स अॅपच्या मदतीने त्यांचा फोन हॅक केला, असं बोललं जातंय.

    वॉशिंग्टन, 22 जानेवारी : अमेरिकी उद्योगपती आणि अॅमेझॉनचे (Amazon) सीईओ जेफ बेझोस (Jeff Bezos)यांचा फोन हॅक करण्यात आला. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी व्हॉट्स अॅपच्या मदतीने त्यांचा फोन हॅक केला, असं बोललं जातंय.एका मीडिया रिपोर्टमध्ये याबद्दल अधिक माहिती देण्यात आलीय. The Guardian या वृत्तपत्रानुसार, जेफ बेझोस यांना 2018 च्या सुरुवातीला सौदीच्या युवराजांनी जेफ बेझोस यांना त्यांच्या पर्सनल व्हॉट्स अॅप नंबरवर एक व्हिडिओ पाठवला. त्यातून जेफ बेझोस यांच्या मोबाइलमधला डेटा चोरला जात होता. त्यांच्या फोनमधून नेमकी कोणत्या माहितीची चोरी झाली ते मात्र कळलेलं नाही. पण बेझोस यांच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर एक वर्षांनी त्यांचा फोन हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. खशोगी यांच्या खुनाचा बदला ? जेफ बेझोस यांच्या 'वॉशिंग्टन पोस्ट'ने सौदीमध्ये झालेल्या पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येबद्दल जोरदार वृत्तांकन केलं होतं. त्यानंतर सौदी सरकारने खशोगी यांची हत्या झाल्याची कबुली दिली होती. यामुळे मोहम्मद बिन सलमान यांची प्रतिमा झाकोळली गेली. याचाच बदला घेण्यासाठी सौदीच्या युवराजांनी जेफ बेझोस यांचा फोन हॅक केला असावा, असं म्हटलं जातं. (हेही वाचा : पेट्रोल स्वस्त होणार हो! कारण ठरतोय हा जीवघेणा चिनी व्हायरस) पुरावे नाहीत जेफ बेझोस यांचे सुरक्षा सल्लागार गॅविन डी बेकर यांनी हा फोन हॅक झाल्याचं म्हटलं होतं पण याबद्दल ते कोणतेही पुरावे देऊ शकले नव्हते. या सगळ्या प्रकरणावर अजून अॅमेझॉन ने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण ही घटना उघड झाल्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे. ===============================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Amezon, Saudi prince

    पुढील बातम्या