मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'राज्यपाल फक्त दारू पिऊन गोल्फ खेळण्याचं काम करतात'

'राज्यपाल फक्त दारू पिऊन गोल्फ खेळण्याचं काम करतात'

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी बागपत या त्यांच्या मूळ जिल्हा सभेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

    बागपत (जम्मू-काश्मीर ), 16 मार्च : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविण्यापर्यंत राज्याचे राज्यपाल राहिलेले आणि सध्या गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. राज्यपालांचं काहीही काम नसतं. काश्मीरचे राज्यपाल नेहमी मद्यपान करून फक्त गोल्फ खेळत असतात. ते काही काम करत नाही असं सत्यपाल मलिक म्हणाले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी बागपत या त्यांच्या मूळ जिल्हा सभेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, "बाकीच्या ठिकाणी (इतर राज्ये) जे राज्यपाल आहेत आरामात राहतात, कोणत्याही भांडणात पडत नाहीत." सत्यपाल मलिक बागपतमधील हिसवडा येथील रहिवासी आहेत. ते पुढे म्हणाले की, 'जेव्हा मला बिहारचा राज्यपाल बनवण्यात आलं, तेव्हा मला वाटलं की तिथली शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. राज्यात शंभर महाविद्यालयं होती जी राजकारण्यांची होती. त्याला शिक्षकही नव्हते. दरवर्षी बी.एड. मध्ये प्रवेश घ्यायचा आणि पैसे देऊन आणि डिग्री वाटून परीक्षा घ्यायची. मी सर्व महाविद्यालयं पूर्ण केली आणि केंद्रीय परीक्षा दिली.' कलम 370 काढून टाकण्यात मलिक यांची महत्त्वाची भूमिका जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढून टाकण्यात तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. त्यानंतर दोन महिन्यांपर्यंत ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल राहिले. त्यानंतर 3 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या