• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • योगी सरकार करतंय दर शनिवारी 'नो स्कूल बॅग डे' ; तावडे असं काही करतील का ?

योगी सरकार करतंय दर शनिवारी 'नो स्कूल बॅग डे' ; तावडे असं काही करतील का ?

शाळेतील मुलांना वाहवं लागणारं दप्तराचं ओझं, हा देशभरातच चर्चेचा विषय आहे. आणि आता योगी आदित्यनाथ सरकार याबाबतच नवीन निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

  • Share this:
13 मे : शाळेतील मुलांना वाहवं लागणारं दप्तराचं ओझं, हा देशभरातच चर्चेचा विषय आहे. आणि आता योगी आदित्यनाथ सरकार याबाबतच नवीन निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी उत्तर प्रदेश सरकार शनिवार हा दिवस 'नो स्कूल बॅग डे' म्हणून घोषित करणार असल्याचं कळतंय. हा निर्णय प्राथमिक तसंच माध्यमिक शाळांना लागू होईल. यामुळे मुलांच्या अभ्यासेत्तर उपक्रमांना वाव देता येणं शक्य होईल. यातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवाद वाढून विद्यार्थांचा व्यक्तिमत्त्व विकास अधिक चांगल्या पद्धतीने होण्यास हातभार लागेल, अशीही सरकारला आशा आहे. हा प्रस्ताव माध्यमिक आणि मूलभूत शिक्षण खातं आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असलेल्या दिनेश शर्मा यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ठेवण्यात आला होता. या निर्णयानंतर शनिवारी शिक्षकांकडून विद्यार्थांना इतर कोणताही टास्क दिला यावू नये, असा आदेशही दिनेश शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिलाय. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, माध्यमिक शिक्षण खात्याच्या एका अधिकाऱ्याने असं सांगितलंय की, सध्या कामकाजाच्या सगळ्याच दिवशी क्लासेस चालू असतात. यामुळे विद्यार्थांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अॅक्टिव्हिटीज करणं शक्य होत नाही. अनेक शाळामध्ये तर खेळाचे साहित्यही नाही. अशा शाळांना सरकार लवकरच विविध सुविधा पुरवणार असल्याचं सांगितलं गेलंय. महाराष्ट्रातही मुलांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत अनेकदा चर्चा झालीय, त्यामुळे महाराष्ट्र सरकारही याबाबत काही निर्णय घेतय का ? हे पहावं लागेल.
First published: