आज प्रचाराचा शेवटचा दिवस गाजणार, मुख्यमंत्री ते राज ठाकरे अशा आहेत सभा!

आज प्रचाराचा शेवटचा दिवस गाजणार, मुख्यमंत्री ते राज ठाकरे अशा आहेत सभा!

आज शेवटच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. पाहुयात आज कुठे असणार कोणाच्या सभा?

  • Share this:

मुंबई, 19 ऑक्टोबर : आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे राजयकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या सगळ्या राजकीय घडामोडींवर आता काही दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आज शेवटच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. पाहुयात आज कुठे असणार कोणाच्या सभा?

- अमित शहा यांची सकाळी खान्देशात तर दुपारी अकोले, कर्जत-जामखेड इथं सभा

- राज ठाकरे ठाण्यात सकाळी 10 वा. सभा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूर इथं रोड शो सकाळी 10 वा. भेटी गाठी

- आदित्य ठाकरे यांचं मुंबईत बाईक रॅली आयोजन

- शरद पवार आणि राष्ट्रवादी नेत्यांची बारामती इथं प्रचार सांगता

- उद्धव ठाकरे यांची भाजप उमेदवाराविरोधात शेवटची सभा साताऱ्यातल्या दहिवडी इथं होणार

- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मालाड इथं दुपारी रोड शो

- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra assembly election 2019) सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सोमवारी  21 तारखेला संपूर्ण राज्यात इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे मतदान (EVM) होणार आहे. 288 जागांसाठी होणाऱ्या या मतदानासाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट)  आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (Control units) सज्ज करण्यात आली आहेत. शिवाय 1 लाख 35 हजार 21 VVPAT  (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रं पुरवण्यात आली आहेत.

यंत्रणा सज्ज

सोमवारी 21 ऑक्टोबरला (Maharashtra polling day) होणाऱ्या मतदानासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीची व्यवस्था (Counting day) वेगळी आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलही सज्ज आहे.

मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा

•    मतदारांना मतदार यादीत नाव आहे की नाही याची माहिती एका क्लिकवर मिळू शकेल. भारतीय निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या वेबसाईटवर मतदान केंद्राबद्दल एका क्लिकवर माहिती मिळू शकेल.

•    या वेबसाईटवर इथे क्लिक करा. स्वतःचे संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर तुमच्या नावाची  माहिती मिळते. मतदाराचं नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या गोष्टी दिलेल्या कॉलममध्ये भरल्यानंतर माहिती मिळू शकते.

•  याशिवाय मतदार ओळख क्रमांक आणि राज्याचं नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याचा दुसरा पर्यायही संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2019 07:15 AM IST

ताज्या बातम्या