पतीने गर्भवती पत्नीला लाथा-बुक्क्यांनी केलं ठार, कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक कारण

मध्य प्रदेशच्या सतनातील नागौड शहरात धर्मेंद्र नावाच्या व्यक्तीने पत्नी सावित्रीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 23, 2019 07:45 PM IST

पतीने गर्भवती पत्नीला लाथा-बुक्क्यांनी केलं ठार, कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक कारण

सतना (मध्य प्रदेश), 23 ऑक्टोबर : रोज म्हटलं तरी माणुसकीला काळीमा फासणारे गुन्ह्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. आताही असाच गुन्ह्याचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका पतीने पाच महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा खून केला आहे. सतना येथील नागौड शहरात राहणाऱ्या धर्मेंद्र यांने अघोरी शक्तीच्या नादी लागत पत्नीला जीवे मारलं आहे. पत्नीला मारहाण करून ठार आरोपी पतीनं तिची हत्या केली आहे. पत्नीच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. परंतु यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जगात येण्याआधीच वडिलांनी केला बाळाचा खून

मध्य प्रदेशच्या सतनातील नागौड शहरात धर्मेंद्र नावाच्या व्यक्तीने पत्नी सावित्रीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जखमी पत्नीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. तर सावित्रीपाच महिन्यांची गर्भवती असल्याचंही डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. खरंतर बाळ जगात येण्यापूर्वीच वडिलांच्या अत्याचाराचा बळी पडलं आहे.

इतर बातम्या -  रोहित पवार जिंकणार तर परळीत टफ फाईट, महाराष्ट्राच्या 20 जागांचा नवा EXIT POLL

पन्ना जिल्ह्यातील सारंग गावात राहणाऱ्या सावित्रीचे 2014मध्ये धर्मेंद्रशी लग्न झाले होते. तर दोघांनाही चार वर्षाची मुलगी आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, या पती-पत्नींमध्ये कधी भांडणं झाली नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून धर्मेंद्र अघोरी शक्ती शिकण्याच्या मागे लागला होता. त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन हरवले होते. त्याला जागेवर आणण्यासाठी अनेक उपचार केले, डॉक्टरांकडे उपचार केले गेले, परंतु तो सुधारला नाही. मंगळवारी रात्री उशिरा त्याने अचानक पत्नीवर हल्ला केला आणि तिची हत्या केली.

Loading...

इतर बातम्या -  भाजपला नाही मिळणार बहुमत, समोर आला आणखी एक EXIT POLL

पत्नीला संपवल्यानंतर धर्मेंद्रने केलं हे काम!

या घटनेनंतर धर्मेंद्र घराच्या खोलीत लपला होता. कुटुंबीयांनी खोली बाहेरून बंद केली. जखमी सावित्रीला हातगाडीवर नागौड रुग्णालयात दाखल केले. तेथून सतनाला पाठवण्यात आलं. उपचारादरम्यान सावित्रीचा मृत्यू झाला. दरम्यान, या सगळ्या प्रकरणाचा पोलीस आता कसून तपास करत असून कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत आहे.

इतर बातम्या -  मतमोजणीच्या तोंडावर नवा सर्व्हे, वंचित आणि मनसे उघणार खातं!

अन्य बातम्या -

पत्नीच्या मृत्यूनंतर समोर आलं धक्कादायक सत्य, लग्नाआधी पतीने केलं होतं...!

भारत-पाक सीमेवर गोळीबार, महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण!

विधानसभेच्या निकालापूर्वीच काढली विजयी मिरवणूक, NCPच्या 'या' उमेदवारावर गुन्हा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...