अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त तरुणाने दिला मोठा संदेश, सगळ्यांनी दिल्या शुभेच्छा

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त तरुणाने दिला मोठा संदेश, सगळ्यांनी दिल्या शुभेच्छा

पुणे-बारामती ही शंभर किलोमीटरची दौड विक्रमी साडे बारा तासात पूर्ण करण्याचा संकल्प सोडत त्यांनी दौडीला सुरुवात केली.

  • Share this:

बारामती, 26 जुलै : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे चाहते बारामती इथल्या ‘आयर्नमॅन’ सतिश ननावरे यांनी पुणे-बारामती शंभर किलोमीटरच्या दौडीला आज पहाटे सारसबागेतील गणरायाचे दर्शन घेवून प्रारंभ केला. पुणे-बारामती ही शंभर किलोमीटरची दौड विक्रमी साडे बारा तासात पूर्ण करण्याचा संकल्प सोडत त्यांनी दौडीला सुरुवात केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शतायुषी व्हावेत आणि त्या निमित्त जनतेला ‘आरोग्य संदेश’ देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. बारामती इथल्या वैष्णवी ग्राफिक्सचे संचालक सतिश ननावरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चाहते आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा शतायुषी व्हावेत म्हणून त्यांनी पुण्यातील सारसबागेतील गणरायाचे दर्शन घेवून या दौडीला आज पहाटे सुरुवात केली.

राज्यात या जिल्ह्यातलं लॉकडाऊन आज रात्रीपासून उठणार, पालकमंत्र्यांची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शतायुषी होण्याबरोबरच सामान्यांना ‘आरोग्य संदेश’ देण्यासाठी त्यांनी या दौडीला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनिल मुसळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

बेरोजगारांसाठी दिलासादायक बातमी, कोरोनाच्या संकटात नवाब मलिकांनी दिली माहिती

कोरोनात नोकरी गेल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल, लेकीला संपवून दांपत्याची आत्महत्या

सतिश ननावरे यांनी ऑस्ट्रीया, ज्युरीस आणि स्विझर्लंड या तीन देशात ‘आयर्नमॅन’ हा किताब मिळवला आहे. यापूर्वी त्यांनी अष्टविनायक यात्राही विक्रमी वेळेत दौड करुन पूर्ण केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्‍ठ नेते खासदार शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमत्त त्यांनी तिरुपती बालाजी ते बारामती हे 1100 किलोमीटरचे अंतर सायकलवर कोठेही थांबा न घेता विक्रमी 52 तासांत पूर्ण केल्याचे श्री ननावरे यांनी सांगितले. श्री ननावरे यांच्या या उपक्रमाचे समाजातील विविध स्तरातील लोकांकडून कौतुक केले जात आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 26, 2020, 7:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading