S M L

चिठ्ठीत लिहली 5 सावकरांची नावं, मोबाईल रेकॉर्डींगकरून उपसरपंचाची आत्महत्या

सातारा जिल्ह्यातील फलटन तालुक्यात होळ गावातल्या उपसरपंचानं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

Updated On: Aug 18, 2018 06:25 PM IST

चिठ्ठीत लिहली 5 सावकरांची नावं, मोबाईल रेकॉर्डींगकरून उपसरपंचाची आत्महत्या

सातारा, 18 ऑगस्ट : सातारा जिल्ह्यातील फलटन तालुक्यात होळ गावातल्या उपसरपंचानं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. खाजगी सावकारकीला कंटाळून विनोद भोसले या तरुण उपसरपंचानं आत्महत्या केलीये. आत्महत्येपूर्वी एका चिठ्ठीत पाच खाजगी सावकारांची नावं त्यांनी नमून केलीयेत. त्याचबरोबर एकाचे फोन रेकॉर्ड़िगंही त्यांच्या मोबाईमधून पोलिसांना सापडलं आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, चिठ्ठीत लिहल्या 5 नगरसेवकांना आणि यासंबंधी आरोपींना जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी पोलिसस्टेशनला घेरलंय आहे. खाजगी सावकारकीला कंटाळून विनोद भोसले या तरुणाने उपसरपंचाने आत्महत्या केल्याने परिसरात तणावाचं वातावरण आहे.

कामावरून परतल्यावर पत्नीला धक्का, समोर होते नवरा आणि 2 मुलांचे मृतदेह

विशेष म्हणजे आत्महत्या करताना त्यांनी चिट्ठीत पाच खाजगी सावकारांची नावें लिहीली आहेत. त्याचबरोबर एकाचे फोन रेकॉर्डिंगही त्यांच्या मोबाईलमधून पोलिसांना सापडलं आहे. एवढेच नव्हे तर सापडलेल्या चिट्ठीच्या चार झेरॉक्स काढून एक चिट्ठी शर्टमध्ये, एक पॅन्टमध्ये, एक मोटारसायकलच्या खोपडीत आणि एक मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवली होती. मी खाजगी सावकारकीला कंटाळून आत्महत्या करीत आहे, असं त्या चिठ्ठीमध्ये लिहलं होतं.

स्ट्रेचरवरून मृतदेह खाली ठेवताना पोलीस कर्मचाऱ्याने मारली लाथ, VIDEO VIRAL

Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2018 06:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close