सातारा, 3 डिसेंबर : महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमरावी पहाटे महाबळेश्वरचा पारा 9 अंशाखाली आला होता. हिवाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच तापमानात एवढी घट झाल्यामुळे पर्यटकांची पावलं आता महाबळेश्वरकडे वळू लागली आहेत.
हिवाळा सुरू झाल्यानंतर परभणी आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांत सर्वात कमी तापमानाची नोद होत असल्याची बातम्या आत्तापर्यत झळकत होत्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या मिनी काश्मीरला यंदा झालंय तरी काय असा प्रश्न सर्वांना पडला होता. परभणी आणि अहमदनगर जिल्ह्याचा पारा 10 अंशापर्यंत खाली आलेला असताना महाबळेश्वरचं तापमान 14 आणि 15 अंशाच्या जवळपास होतं.
पण, सोमवारी पहाटे महाबळेश्वरचं तापमान 9 अंशाच्या खाली आलं. यामुळे गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं आता महाबळेश्वरच्या दिशेने वळायला लागली असल्याचं दिसून येत आहे. सोमवारी महाबळेश्वरातल्या वेण्णा लेक, लिंग मळा परिसरात पर्यटक गुलाबी थंडाचा आनंद लुटताना दिसून आले. तर दिवस कलंडताच महाबळेश्वमध्ये अनेक ठिकाणी शेकोट्या पेटायला सुरूवात झाली आहे.
पारा खाली घसरल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी महाबळेश्वर सज्ज झालं आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी हॉटेल, रिसॉर्ट्स व्यावसायीकांनी कंबर कसली आहे. महाबळेश्वर परिसरात स्ट्रॉबेरीचं सर्वीधीक पिक घेतलं जातं. वाढलेल्या थंडीमुळे स्ट्रॉबेरीच्या पिकाला चांगला फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मुंबईत पहाटेचा गारवा वाढला
गेल्या अनेक दिवसांपासून गुलाबी थंडीची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना आता जरा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि मुंबईत्या बहुतांश उपनगरांमध्ये पहाटेचा गारवा चांगलाच वाढला आहे. यामुळे सकाळी फिरावयास जाणाऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे.
VIDEO: मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा असा अंदाज तुम्ही पाहिलाच नसेल