खो-खो करत 'दंगल' गर्ल्सने २५ वर्षे गाजवली राज्य आणि राष्ट्रीय स्तर !

खो-खो करत 'दंगल' गर्ल्सने २५ वर्षे गाजवली राज्य आणि राष्ट्रीय स्तर !

साखरवाडी ते दिल्ली...खो-खोच्या दंगल गर्ल्सची थक्क करणारी कहाणी

  • Share this:

(विकास भोसले, प्रतिनिधी )

सातारा, 20 ऑगस्ट : सातारा जिल्ह्याला जशी सैनिकी परंपरा आहे तशीच खो-खो या खेळाचीही परंपरा आहे. साताऱ्यातल्या फलटण तालुक्यातील साखरवाडी या गावातील मुलींनी गेली २५ वर्षे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपला खो-खो या खेळातला दबदबा कायम ठेवलाय. साताऱ्यापासून 30 किमी अंतरावर असणारं साखरवाडी गाव. साखर कारखान्यासाठी हे गाव प्रसिद्ध असलं तरी सध्या मात्र हे गाव गाजतंय इथल्या खोखो खेळाडूंमुळे. या गावच्या मुलींच्या संघानं राष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण केलाय. त्यामुळे अगदी नामांकित संघांनीही या मुलींचा धसका घेतलाय.

शहरांच्या मानानं अद्ययावत सुविधा उपलब्ध नसतानाही केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर या मुली राष्ट्रीय पातळीवर नाव कमावतायेत. आतापर्यंत ४ वेळा साखरवाड़ीने राज्य संघात कर्णधार म्हणून भूमिका बजावली आहे. ७५ राज्य स्तरीय तर २२ राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. खेळायला उतरल्यावर फक्त जिंकून येणे इतकंच साखरवाडीच्या या दंगल गर्ल्सना माहिती आहे. त्यामुळेच त्यांच्या शाळेची, घराची कपाटं ही अशी पदकानं भरून गेलीयेत.

पण एवढं सगळं यश असताना आजही ग्रामीण भागात क्रीडा संकुलं उभारण्यात येत नाहीत अशी खंत प्रशिक्षक संजय बोडरे व्यक्त करतात. आपल्या जिद्दीच्या, कौशल्याच्या जोरावर साखरवाडीच्या या दंगल गर्ल्स सध्या खो-खोचं मैदान गाजवतायेत. त्यांना आणि त्यांच्या सारख्या अनेक खेळाडूंनी गरज आहे ती आपल्या प्रोत्साहनाची आणि शासनाच्या मदतीची.

 अनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म

First published: August 20, 2018, 7:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading