पाच वर्ष आणि मोहन भागवतांची ती पाच भाषणं ज्यातून मोदींना दिला संदेश!

पाच वर्ष आणि मोहन भागवतांची ती पाच भाषणं ज्यातून मोदींना दिला संदेश!

केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर सरसंघचालकांनी दसरा उत्सवातल्या सर्व भाषणांमध्ये सरकारचं कौतुक तर केलं मात्र सरकारच्या डोक्यात हवा जाणार नाही याचीही दक्षता घेतली.

  • Share this:

नागपूर, ता.17 ऑक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी म्हणजेच दसरा उत्सव हा सर्वात महत्वाचा कार्यक्रम समजला जातो. या उत्सवातलं सरसंघचालकांचं भाषण हा संघाच्या धोरणाच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचं मार्गदर्शन समजलं जातं. सरसंघचालकही या प्रदिर्घ भाषणात संघाच्या पुढच्या वाटचालीचं सुतोवाच करत असतात. 2014 मध्ये ऐतिहासिक बहुमत मिळवत भाजपनं देशात सत्ता मिळवली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. संघांच्या प्रयत्नांना आलेलं हे मोठं यश होतं. गेल्या पाच वर्षांच्या भाषणांमध्ये भागवतांनी दरवर्षी आपल्या भाषणांमध्ये सरकारचं कौतुक केलं. पण त्याच बरोबर सत्ता डोक्यात जावू देऊ नका, व्यक्ती स्तोम कमी करा, 'मुक्त' नाही तर 'युक्त'चं धोरण घ्या असं सांगत नरेंद्र मोदींना चार गोष्टी सुनावण्यासही कमी केलं नाही. त्याच्या पाच वर्षांच्या भाषणांचा हा वेध...

2014 : देशात ऐतिहासिक परिवर्तन

केंद्रोत नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतरचं संरसंघचालकांचं हे पहिलच भाषण होतं. त्यामुळं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मोहन भागवत यांनी देशातल्या सत्ता परिवर्तनाचा उल्लेख केला. देशाला विश्वगुरू बनवायचं आहे. त्याच दृष्टीनं लोकांनी हे परिवर्तन केलंय. असं परिवर्तन फार कमी वेळा होतं असतं.

देशात बदल घडवण्यासाठी लोकांनीही पुढं आलं पाहिजे कारण कुठलंही सरकार, व्यक्ती, संस्था किंवा एखादा समूह ही क्रांती घडवून आणू शकत नाही त्यासाठी सर्व लोकांनी पुढं आलं पाहिजे आणि सरकारनही लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे असं सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा संदेश दिला.

2015 : आरक्षण कायम राहणार

सरसंघचालकांच्या आरक्षणा संदर्भातल्या वक्तव्यामुळं देशभर वादळ उठलं होत. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका भाजपला बसला. त्या मुद्यावर मोहन भागवत यांनी स्पष्टीकरण देत संघाचा आरक्षणाला विरोध नाही हे स्पष्ट केलं. काही लोकांनी त्याचं राजकारण केलं आणि संघाला ते मान्य नाही. मात्र तळागाळातल्या लोकांच्या विकासासाठी घटनेनं दिलेलं आरक्षण टिकवलच पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं.

हिंदुत्व हाच भारताचा आत्मा आहे. हिंदुत्वानेच देश टिकवून ठेवला आहे. देशात काही दलित अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. देशाची एकता टिकवून ठेवण्यासाठी या घटना मारक आहेत.अशा घटनांकडे दुर्लक्ष करा असं आवाहन त्यांनी केलं. अशा घटनांवरून विरोधी पक्षांनी सरकारला आणि संघ परिवातातल्या संघटनांना धारेवर धरलं होतं.

त्यामुळं या घटनांवर भाष्य करून त्यांनी विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. सरकारने आर्थिक धोरण राबवताना ते भारत केंद्रीत करावं असा सल्लाही त्यांनी दिला.

2016 : सर्जिकल स्ट्राईकचं कौतुक

यावर्षी झालेला विजयादशमी उत्सव हा संघाचा नव्या गणवेशात झालेला पहिलाच उत्सव होता. काही महिन्यांपूर्वी लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर बोलताना मोहन भागवत यांनी लष्कराचं तोंड भरून कौतुक केलं आणि ठोस निर्णय घेतल्याबद्दल नरेंद्र मोदींचीही पाठ थोपटली.

लोकांचा केंद्र सरकारवर विश्वास वाढला आहे. मात्र काश्मीरमधल्या पीडीपी-भाजप सरकारच्या कामकाजाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारनं भेदभाव न करता सगळ्या नागरिकांसाठी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं.

2017 :  गोरक्षा आणि हिंसेचा संबंध नाही

यावर्षी गोरक्षेच्या नावावर देशात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. केंद्र सरकारवर चौफेर टीका झाली. संघ आणि संघ परिवारातल्या संघटनांवरही कोरडे ओढले गेले त्यामुळं यावर्षीच्या भाषणात सरसंघचालकांनी गोरक्षा आणि हिंसेचा काहीही संबंध नाही असं निक्षून सांगितलं आणि आपल्यावरच्या विरोधाची धार कमी केली.

अशी हिंसा सरकारने खपवून घेऊ नये. अनेक मुसलमानही गोरक्षणाचे काम करत आहेत. गेल्या 70 वर्षात पहिल्यांदाच देशाचा गौरव आणि प्रतिष्ठा वाढली आहे याचा अनुभव होतोय. जगात देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. पहिले भरताला गृहित धरलं जात होतं, कुणी फारसं विचारत नव्हतं. सरकार अनेक चांगल्या योजना तयार करतं. पण प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही याकडे सरकारनं लक्ष ठेवलं पाहिजे असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

2018

 

First published: October 18, 2018, 6:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading