Facebook वर झालेल्या वादात दोन भावांना चाकूने भोसकलं, एकाचा मृत्यू तर दुसरा...

Facebook वर झालेल्या वादात दोन भावांना चाकूने भोसकलं, एकाचा मृत्यू तर दुसरा...

मंगळवारी नाटक पाहताना किरकोळ वादात काही तरुणांनी गावातल्या एका युवकाची चाकूने हत्या केली.

  • Share this:

छपरा(बिहार), 06 नोव्हेंबर : सोशल मीडियावर होणारे वाद आपण सगळ्यांनीच पाहिले आहेत. याच वादात एका तरुणाची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. एका तरुणाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार केलं आणि त्या अकाऊंटवरून एका दुसऱ्या युवकावर कमेंट्स केल्या. या सगळ्यातून दोघांमध्ये असं काही भांडण झालं ज्याचं रुपांतर चक्क हत्येमध्ये झालं. या प्रकरणामध्ये सुधीर कुमार नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

नाटक पाहताना केली हत्या

मंगळवारी नाटक पाहताना किरकोळ वादात काही तरुणांनी गावातल्या एका युवकाची चाकूने हत्या केली. या घटनेनंतर संतप्त लोकांनी सिंघी गावाजवळील छपरा-पाटणा रस्ता रोखला. सुमारे 3 तास रस्त्या जाम करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सिंघी गावात तीन दिवस नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. बालविवाह आणि हुंडा प्रथा यावर नाटक सादर केले जात होते. दरम्यान, डुमरी मुकुंद राय येथील टोला येथे राहणारा वीर बहादुर राय यांचे पुत्र सुधीर कुमार आणि संतोष कुमार हे नाटक पाहण्यासाठीही आले होते.

इतर बातम्या - 45 वर्षाच्या भाजप नेत्याचं तिसरं लग्न, 18 वर्ष लहान तरुणीशी केला विवाह

धाकट्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या मोठ्या भावावरही हल्ला

सुधीर आणि संतोषने गावातील काही तरुणांवर फेसबुकवरून आक्षेपार्ह भाष्य केल्यामुळे गावात तरुणांमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे गावातील इतर तरुणांनी या भावंडांना मारण्याचा प्लान केला. काही तरुणांनी मिळून आधी संतोषला मारहाण केली. संतोषला  मारहाण होताना पाहून त्याचा मोठा भाऊ सुधीर त्याला वाचवण्यासाठी गेला. या वेळी तरुणांनी चाकूने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात सुधीर कुमार याचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंबीयांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सुधीरला तातडीने दिघवारा पीएचसी इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी गंभीर प्रकृती पाहता त्यांना पाटणा पीएमसीएच इथे दाखल करण्यासाछी सांगितलं. पण अखेर यात सुधीरचा मृत्यू झाला.

इतर बातम्या- 'सरसकट कर्जमाफी, सरसकट ओला दुष्काळ आणि सरसकट पवार हे राज्याचे मुख्यमंत्री'

3 दिवसांआधी सुरू झाली होती वादाला सुरुवात

3 दिवसांआधी फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट्स केल्यामुळे दोन गटांमध्ये वाद सुरू होता. अशात गावात नाटकाचं आयोजन करण्यात आलं असता यावेळी संधी साधून तरुणांनी सुधीर आणि संतोषवर हल्ला केला. यामध्ये गंभीररित्या चाकूने शरीरावर वार झाल्यामुळे सुधीरचा मृत्यू झाला. या सगळ्या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून आता पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bihar News
First Published: Nov 6, 2019 04:37 PM IST

ताज्या बातम्या