ARTICAL 15: देश हादरला; 5 अल्पवयीन मुलींचं अपहरण, एकीचा सापडला मृतदेह

ARTICAL 15: देश हादरला; 5 अल्पवयीन मुलींचं अपहरण, एकीचा सापडला मृतदेह

काही अज्ञातांनी गावातील 5 लहान मुलींचं अपहरण करून पळून नेल्याची माहिती समोर आली आहे. यातील तीन मुलींना पळून जाण्यात यश मिळालं आहे तर दोघींना अपहरणकर्त्यांनी पळवलं आहे.

  • Share this:

छपरा(बिहार): एकाच गावातील 5 मुलींचं एकाच वेळी अपहरणा झाल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. काही अज्ञातांनी गावातील 5 लहान मुलींचं अपहरण करून पळून नेल्याची माहिती समोर आली आहे. यातील तीन मुलींना पळून जाण्यात यश मिळालं  आहे तर दोघींना अपहरणकर्त्यांनी पळवलं आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे अपहरण झालेल्या मुलींपैकी एकीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सीमा कुमारी असं मृत मुलीचं नाव आहे. सीमा इयत्ता तिसरीमध्ये शिकत होती. तर राणी कुमारी असं बेपत्ता मुलीचं नाव असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. खरंतर 'आर्टिकल 15' हा सिनेमा अशाच घटनेवर आधारीत आहे. अवघ्या 3 रुपयांसाठी तरुण मुलींचं शोषण केलं जात असं या सिनेमात दाखवण्यात आलं आहेत. या सगळ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

एकत्र खेळण्यासाठी गेल्या होत्या मुली...

बिहारच्या छपरा जिल्ह्यातील रिवीलगंजच्या बिनटोलियामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मुली एकत्र खेळायला गेल्या होत्या. तिथे काही अज्ञात लोकांनी मुलींना छेडण्यास सुरवात केली. यावेळी तीन मुली चकवा देऊन पळून गेल्या तर दोन बेपत्ता आहेत. त्यातील एकाचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला. घटनेनंतर डीएसपी अजय कुमार सिंह घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला.

एसपी म्हणाले - बलात्कार झाला नाही

एसपी हर किशोर राय यांनी सांगितले की, पोलिस तपासणीत दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली असून, त्यात आज सकाळी मुलीचा मृतदेह सापडला. त्याचवेळी दुसरी मुलगी राणी बेपत्ता आहे. या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस छापा टाकत आहेत. मृत मुलीवर बलात्कार केल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नसल्याचे एसपी यांनी सांगितलं. तथापि, वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. घटनास्थळी पोलिस अद्याप तळ ठोकून आहेत.

कुटुंबातील सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण

मुलीचा मृतदेह सापडल्याच्या घटनेनंतर कुटुंबात भीतीचं वातावरण आहे. कारण अद्याप राणी बेपत्ता आहे. एसपी हर किशोर राय यांनी म्हटले आहे की, लवकरात लवकर प्रकरणाचा शोध लावू. ते वैद्यकीय अहवालानंतरच मुलाची हत्या का केली गेली हे स्पष्ट होईल.

First published: November 18, 2019, 6:43 PM IST
Tags: Bihar News

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading