मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /खळबळजनक! पुलाखाली सापडला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह

खळबळजनक! पुलाखाली सापडला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह

bihar

bihar

सकाळी स्थानिकांना मृतदेह दिसताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी झालीय.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

पाटणा, 20 मार्च : छपरा जिल्ह्यातील गरखा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्यान खळबळ उडाली आहे. गुन्हेगारांनी महिलेची हत्या केल्यानतंर पुलाखाली मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह पूर्णपणे जळाला नाही. सकाळी स्थानिकांना मृतदेह दिसताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी झालीय. पोलिसांना अद्याप मृतदेहाची ओळख पटवता आलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

स्थानिक मुकेश तिवारीने सांगितलं की, काल सायंकाळपर्यंत इथे काहीच नव्हतं, पण आज सकाळी लोकांना पुलाजवळ दुर्गंधी येत होती. तिथे महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह पाहिल्यानंतर खळबळ उडाली. मृतदेह आढळून आल्यानंतर याची माहिती परिसरात समजली. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील बेपत्ता महिलांबाबत चौकशीही करण्यात आली. मात्र महिलेची ओळख पटवता येईल अशी माहिती मिळालेली नाही.

शौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून दोन गट भिडले, वैजापूरमध्ये लॉज मालकासह एकाला बेदम मारहाण

एसपी गौरव मंगला यांनी सांगितले की, गरखा पोलीस स्टेशनला स्थानिकांकडून माहिती मिळाली की, महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह पुलाखाली पडला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. तर, पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून हत्या करून जाळण्याचा प्रयत्न केलाय की नाही यादृष्टीने तपास केला जात आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच माहिती मिळू शकते.

First published:
top videos

    Tags: Bihar, Local18