बिहार, 09 जुलै : प्रेमाला काही बंधनं नसतात आणि त्यात काही सीमा नसते. प्रेमात वेडा झालेला व्यक्ती काहीही करू शकतो हे तुम्ही पाहिलंच असेल. याचाच एक पुरावा देणार प्रकार समोर आला आहे. वहिणीच्या प्रेमात पडलेल्या एका तरुणाने चक्क आपल्या भावाची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वहिनीच्या प्रेमाचं भूत असलेल्या एका तरुणाने तिला मिळवण्यासाठी आपल्या सख्या भावाची हत्या केली. बरं इतकंच नाही तर भावाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने शव नदीत फेकून दिलं. पोलिसांच्या कसून चौकशीनंतर ही घटना उघडकीस आली आहे.
वहिनीसाठी भावाचा जीव घेणारा पोलिसांच्या ताब्यात
छोटेलाल राय असं मृत भावाचं नाव आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शैलेंद्र राय आणि मृत छोटेलालच्या पत्नीचा ताब्यात घेतलं आहे. आपल्या प्रेमाला जिंकण्यासाठी भावाचाच जीव घेतल्य़ामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे. 'भाऊ माझ्या आणि वहिनीच्या प्रेमाच्या आड येत होता. त्यामुळे मी त्याची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह नदीत फेकून दिला' अशी कबुली आरोपी शेलैंद्रने पोलिसांत दिली आहे.
आतापर्यंत मृत छोटेलालचा मृतदेह सापडला नाही
या घटनेला आता आठवडा पूर्ण होईल पण तरीदेखील नदीतून मृत छोटेलाल राय याचा मृतदेह सापडला नाही. तर मृतदेह मिळावा यासाठी नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एसडीआरएफची मदत घेतली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राय कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर गावातून या प्रकारावर शोककळा व्यक्त केली जात आहे.
भारताच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींकडून प्रार्थना, यासोबत इतर 18 घडामोडींचा आढावा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा