मुंबई, ०८ मार्च २०१९- सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खानने केदारनाथ सिनेमातून बॉलिवूड क्षेत्रात दणदणीत पदार्पण केलं. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ठिक ठाक कमाई केली असली तरी साराच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. केदारनाथनंतर २०१८ मध्ये ती रणवीर सिंगच्या सिंबा सिनेमातही झळकली होती. या सिनेमाने १०० कोटींहून अधिक कमाई केली होती. सारा सोशल मीडियावरही फार सक्रीय आहे.
सध्या साराचा एक फार जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती सैफ अली खानसोबत दिसत आहे. अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शोमध्ये सारा बाबा सैफ अली खानसोबत गेली होती. सलाम नमस्ते सिनेमाच्या प्रमोशनसाठी सैफ आणि प्रीति झिंटा या शोमध्ये गेले होते. २००५ मधला हा व्हिडिओ आहे.
अमिताभ बच्चन साराकडे पाहून म्हणतात की, ‘सैफसोबत त्याची मुलगी साराही आली आहे... सारा तू कशी आहेस? तू मला आदाब करशील?’ यानंतर सारा आज्ञाधारक मुलीप्रमाणे आदाब करते. यावर अमिताभ तिला परत प्रश्न प्रश्न विचारतात की, ‘मला दिसतंय की, सारा तुझ्यासोबत तुझी मैत्रीणही आली आहे. कृपया साऱ्यांनी सारासाठी टाळ्या वाजवा.’
साराच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच तू कार्तिक आर्यनसोबत इम्तियाज अलीच्या लव्ह आज कलच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. नुकतीच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. सिनेमाच्या पहिल्याच सीनमध्ये कार्तिक साराला किस करताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
VIDEO : अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा आणि सुप्रिया सुळे...कसं आहे नणंद-भावजयमधील बाँडिंग?