अचानक एक्स बॉयफ्रेंडला समोर पाहून सारा अली खानने फिरवला चेहरा

अचानक एक्स बॉयफ्रेंडला समोर पाहून सारा अली खानने फिरवला चेहरा

फार कमी लोकांना माहीत आहे की, सिनेसृष्टीत येण्यापूर्वी साराचं ब्रेकअप झालं होतं. शिवाय तो महाराष्ट्रातील फार मोठ्या नेत्याचा नातू आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे- बॉलिवूडची होतकरू अभिनेत्री आणि सैफ अली खान- अमृता सिंगची मुलगी सारा अली खान ही तरुणाईच्या गळ्यातली ताईत झाली आहे. आतापर्यंत साराने फक्त दोनच सिनेमे केले असले तरी सोशल मीडियावर तिची क्रेझ अफलातून आहे. कॉफी विथ करणमध्ये जेव्हा साराने तिला कार्तिक आर्यनला डेट करायचं म्हटलं तेव्हा अनेक तरुणांची हृदयही तुटली होती. पण या सगळ्यात फार कमी लोकांना माहीत आहे की, सिनेसृष्टीत येण्यापूर्वी साराचं ब्रेकअप झालं होतं.

सनी लिओनीने 'या' एका अटीवर साइन केलेले सहा पॉर्न सिनेमे

साराने एका मुलाखतीत म्हटलं की, तिने आतापर्यंत फक्त वीर पहाडियाला डेट केलं आहे. वीर हा माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीरबद्दल सविस्तर बोलताना सारा म्हणाला की, ‘आमच्या दोघांच्या नात्यात सर्वकाही सुरळीत होतं. कोणतीच गोष्ट आमच्या नात्यात आली नव्हती. वीरने माझं मनंही कधी मोडलं नाही. आम्ही एका चांगल्या वळणावर दोघांच्याही मर्जीने नातं संपवलं.’ एक वर्ष नात्यात राहिल्यानंतर दोघांनी २०१७ मध्ये ब्रेकअप केलं. आता जवळपास दोन वर्षांनी सारा आणि वीर समोरा समोर आले.

पायांवरच्या केसांमुळे शाळेत ट्रोल व्हायची सनी लिओनी

एका वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, स्टूडंट ऑफ दी इअर २ सिनेमाच्या स्क्रीनिंगला सारा आणि वीर पोहोचेल होते. SOTY2 ची अभिनेत्री अनन्या पांडे साराची जेवढी चांगली मैत्रीण आहे तेवढीच चांगली मैत्रीण ती वीरचीही आहे. अनन्याच्या गेस्ट लिस्टमध्ये दोघांचंही नाव होतं. स्क्रीनिंगवेळी सारा, वीरपेक्षा फार लांब बसली होती. दोघांनी एकमेकांना पाहिलं पण बोलणं टाळलं.

‘ती अजूनही माझ्या कवेत आहेत,’ विवेकच्या या वक्तव्यानंतर सलमानने दिली होती ‘ही’ धमकी

सिनेमा संपल्यानंतर सारा तिकडून लगेच निघून गेली. तर अनन्या तिच्या इतर मित्र- मैत्रिणींशी बोलताना दिसली. असं म्हटलं जातं की, वीरमुळे सारा तिकडून लवकर निघून गेली. त्यामुळे वीरसोबत पुन्हा मैत्री करण्यात साराला काही स्वारस्य नाही.

1.5 कोटींचं फक्त जिम, शाहरुख- अमिताभ यांच्यापेक्षाही दुप्पट महाग गाडी वापरतो हा सुपरस्टार

साराच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती लव्ह आज कल २ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक आर्यन दिसणार आहे. दिल्ली आणि उदयपुर येथे चित्रीकरण झाल्यानंतर सध्या सिनेमाची टीम मुंबईत चित्रीकरण करत आहे. पुढच्या वर्षी व्हॅलेंटाइन डेला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

VIDEO- ‘अरे, किमान दरवाजा तरी बंद करत जा...’, शाहिद कपूरला नेटकऱ्यांनी दिला सल्ला

VIDEO: केरळमध्ये पौर्णिमेची धमाल, हत्तीच्या सोंडेनं उघडलं दक्षिणेचं दार

First published: May 13, 2019, 12:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading