Home /News /news /

VIDEO: सारा मंदिराच्या बाहेर येताच छोट्या भिकाऱ्याने मागितले पैसे, अशी दिली रिअॅक्शन

VIDEO: सारा मंदिराच्या बाहेर येताच छोट्या भिकाऱ्याने मागितले पैसे, अशी दिली रिअॅक्शन

आताही एका वेगळ्याच कारणामुळे तिेने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. सध्या साराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

  मुंबई, 14 जानेवारी : रोज एका नव्या कारणामुळे बॉलिवूडमधील स्टार्स चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांत अनेक हॉट फोटोमुळे अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर चर्चेत होती. आताही एका वेगळ्याच कारणामुळे तिेने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. सध्या साराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सारा एका लहान मुलाला मदत करताना पाहायला मिळते. सारा अली खानच्या या व्हिडिओमुळे सर्व लोकांच्या नजरा तिच्याकडे ओढावल्या आहे. त्याबरोबर तिचे चाहते या व्हिडिओमुळे तिचे कौतुक करत आहे. सारा अली खान तिच्या व्हायरल व्हिडिओमध्ये जुहूच्या मुक्तेव्श्रर मंदिराच्या बाहेर दिसत आहेत. ती मंदिराच्या बाहेर येऊन कारमध्ये बसायला जाते, तेव्हा ती पाहते की, एक मुलगा तिच्याकडे भीक मागत येतो. त्यावेळेस सारा कारमधून एका व्यक्तीकडून पैसे मागून त्या मुलाला पैसे देते. त्यानंतर ती हात जोडून कारचा दरवाजा बंद करते.
  यावेळी सारा अली खान एका सुंदर पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. सारा अली खान लवकरच कार्तिक आर्यन सोबत ‘लव आजकल 2’ मध्ये पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण च्या ‘लव आजकल’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. याच्या व्यतिरिक्त सारा आली खान ही लवकरच वरुण धवनसोबत ‘कुली नंबर वन’ मध्येही दिसणार आहे.  सारा अली खानने ‘केदारनाथ’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पर्दापर्ण केले होते. त्यासाठी तिला बेस्ट डेब्यू नायिका फिमेलचा अवॉर्ड मिळाला होता.
  Published by:Renuka Dhaybar
  First published:

  Tags: Sara ali khan

  पुढील बातम्या