सारा अली खानच्या या बोल्ड फोटोवर युझर्स म्हणाले, ‘आता तरी बुरखा घाल गं...’

साराने नुकतंच एक फोटोशूट केलं या फोटोशूटमधला एक फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. पण या फोटोवर तिला उलट प्रतिक्रिया मिळत आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 12, 2019 02:18 PM IST

सारा अली खानच्या या बोल्ड फोटोवर युझर्स म्हणाले, ‘आता तरी बुरखा घाल गं...’

मुंबई, 12 मे- अवघ्या दोन सिनेमांमध्येच तरुणाईच्या गळ्यातली ताईत झालेल्या सारा अली खानला मात्र सध्या चांगलंच ट्रोल केलं जातंय. एकीकडे सारा तिच्या चांगल्या स्वभावामुळे अनेकांच्या गुड बुकमध्ये येतेय तर दुसरीकडे कपड्यांवरून तिला ट्रोल केलं जातंय.

साराने नुकतंच एक फोटोशूट केलं या फोटोशूटमधला एक फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. पण या फोटोवर तिला उलट प्रतिक्रिया मिळत आहेत. अनेकजण तिला सुधारण्याचे सल्ले देत आहेत. तसेच रमजान सुरू असताना असे कपडे घातल्याने तिचा रोजा खराब झाल्याचंही ते म्हणत आहेत.

Happy Mother's Day 2019: या प्रसिद्ध सेलिब्रिटींचे आईसोबतचे दुर्मिळ फोटो पाहिलेत का?

कधीही आई होणार नाही कविता कौशिक, जाणून घ्या कारण

एका युझरने लिहिले की, ‘मुली, सध्या रमजान सुरू आहे. तर किमान या दिवसांमध्ये तरी बुरखा घातलेला फोटो टाकत जा. अशावेळी माशाअल्लाह बोलण्याऐवजी अस्तगफिरुल्लाह बोलावं लागत आहे. सुधर जरा.’ दुसऱ्या युझरने लिहिले की, ‘रमजानच्या दिवसांमध्ये अशा पोस्ट टाकताना तुला लाज वाटली नाही का?’ तर अजून एका युझरने म्हटलं की, ‘असे फोटो टाकून आमचा रोजा खराब करू नकोस.’

Loading...

मध्यरात्री ‘सैफिना’सोबत डिनर डेटला गेले अर्जुन- मलायका

सारा अली खान सध्या इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आजकल २’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक आर्यन दिसणार आहे. या सिनेमाशिवाय ती वरुण धवनसोबत ‘कुली नंबर १’ मध्येही दिसणार आहे. हे दोन्ही सिनेमे पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहेत.

मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसाला अदनान सामीने दिलेल्या गिफ्टची किंमत ऐकाल तर...

SPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2019 02:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...