महाराष्ट्रात राजकीय चित्र बदलणार, काँग्रेसबाबत संजय राऊत म्हणाले...

महाराष्ट्रात राजकीय चित्र बदलणार, काँग्रेसबाबत संजय राऊत म्हणाले...

'काँग्रेस आणि आमचे विचार वेगळे असले म्हणून आम्ही एकमेकांचे शत्रू नाही आहोत. अनेकदा आम्ही भाजपच्या विरोधातही मुद्दे मांडले. त्यामुळे ते आमचे शत्रू आहेत असं नाही'

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच अद्याप कायम आहे. सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांकडून सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण देण्यात आलं. पण अद्यापही सेना-भाजपमधले वाद काही संपताना दिसत नाहीत. सत्तेच्या या तिढ्यामध्ये आता राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्रात प्रत्येकाला वाटतं स्थिर सरकार यावं, पण त्यामुळे काँग्रेस आमचा शत्रू नाही अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

'काँग्रेस आणि आमचे विचार वेगळे असले म्हणून आम्ही एकमेकांचे शत्रू नाही आहोत. अनेकदा आम्ही भाजपच्या विरोधातही मुद्दे मांडले. त्यामुळे ते आमचे शत्रू आहेत असं नाही' असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसविषयी वक्तव्य केलं आहे. तर राष्ट्रवादीकडे चांगले नेते होते आणि आहेत असं संजय राऊत म्हणाले. खरंतर विरोधी पक्षात राहण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. पण तरी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतं.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

- आता आमदार फोडण्याची हिंमत कोणामध्ये नाही

- कोणत्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही

- भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी ऐवढे दिवस का लावले माहित नाही

- उद्धव ठाकरे आज शिवसेना आमदारांना भेटणार

- आम्ही राजकारणाचा व्यापार केला नाही

- राम मंदिर एका पक्षाचा नाही संपूर्ण देशाचा मुद्दा

- भाजपनं या संधीचा लाभ घ्यावा-राऊत

- भाजपकडे बहुमत नाही असं वाटत नाही'

भाजप आणि शिवसेनेनं युतीमध्ये राहून राष्ट्रवादी आणि काँग्रेसविरोधात निवडणुका लढल्या. यात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपने आणि दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेनं मान मिळवला. पण याच मतांच्या आकड्यामुळे दोन्ही पक्षात मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू झाला. या सगळ्या वादात कोणत्याही पक्षाने अद्याप सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. त्यानंतर विधानसभेचा कार्यकाळ संपला म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर फडवीसांनी भाजपच्या बड्या नेत्यांसह दोन वेळा राज्यपालांची भेट घेतली. पण बहुमत नसल्यामुळे भाजपने अद्याप सत्ता स्थापनेचा दावा केला नाही.

अखेर या सगळ्यावर राज्यपालांनी मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं. पण त्यांच्याकडे बहुमत नसल्याने ते शिवसेनेच्या पाठिंब्याच्या अपेक्षेत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. दरम्यान, बहुमत सिद्ध करण्यासाठी काँग्रेस शिवसेना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत. त्यामुळे आता राज्यात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बहुमत सिद्ध करण्यासाठी शुभेच्छा..

बहुमत सिद्ध करण्यासाठी संजय राऊत यांनी भाजपला शुभेच्छाही दिल्या आहेत. भाजपने 24 तासांत दावा करायला हवा होता. कोणत्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. अयोध्याप्रकरणाचा निकाल कुण्या एका पक्षाचा नाही. अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाला हा संपूर्ण देशासाठी असल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुन्हा फडणवीसच मुख्यमंत्री होणार? भाजपसमोर 3 पर्याय पण...

महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी सत्ता स्थापनेसाठी सर्वात मोठा पक्ष भाजपला आमंत्रण दिलं आहे. सेना-भाजपने युती करून निवडणूक लढवली. पण बहुमताचा आकडा गाठल्यानंतर दोन्ही पक्षातील वाद वाढला. निकालानंतर त्यांच्यात सत्तेच्या वाटपावरून एकमत झाले नाही आणि युतीची चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे अखेर शुक्रवारी 8 नोव्हेंबर रोजी 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात आला पण भाजपला सरकार स्थापन करता आले नाही. त्यानंतर पुढच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईपर्यंत त्यांच्याकडे काळजावाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं असलं तरी सभागृहात विश्वास ठराव जिंकण्यासाठी आवश्यक बहुमताचा आकडा मिळवणं त्यांच्यासमोर आव्हान असेल. भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. परंतु, दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच पाहण्यास मिळाली. आता फडणवीस यांना आपल्याकडे बहुमतासाठी किती आमदार आहे, किती जणांचा पाठिंबा आहे, हे सांगावं लागेल. त्यानंतर बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

राज्यात सत्ता स्थापनेसाठी सध्या काही पर्याय आहेत त्यामध्ये नवी राजकीय समीकरणं, दुसऱ्या पक्षांचे आमदार फोडणे. यातील नव्या राजकीय समीकरणांमध्ये भाजपला सेना वगळता कोणताही पक्ष पाठिंबा देईल अशी चिन्हे नाहीत. सेनेसोबत कोणतीच तडजोड होऊ न शकल्याने फडणवीस यांनी, 'युती तोडायची की नाही सेनेनं ठरवावं' असंच जाहीर करून टाकलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही, मुख्यमंत्रिपदाबाबत ठरलं होतं आणि मी बाळासाहेबांना वचन दिलं ते पूर्ण करणारच, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु, भाजपने चर्चेचा पर्याय अजूनही खुला ठेवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 11:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading