S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

मोदींनी चहा विकल्याचा पुरावा दाखवावा, मी राजकारण सोडेन- संजय राऊत

मोदी नेहमी स्वतःला चहा विकणारा पंतप्रधान म्हणून मिरवतात, पण माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे, त्यांनी चहा विकल्याचा एकही पुरावा सादर करावा, मी राजकारण सोडून देईल, अशा कठोर शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीय.

Chandrakant Funde | Updated On: Dec 8, 2017 09:07 PM IST

मोदींनी चहा विकल्याचा पुरावा दाखवावा, मी राजकारण सोडेन- संजय राऊत

08 डिसेंबर, सासवड : मोदी नेहमी स्वतःला चहा विकणारा पंतप्रधान म्हणून मिरवतात, पण माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे, त्यांनी चहा विकल्याचा एकही पुरावा सादर करावा, मी राजकारण सोडून देईल, अशा कठोर शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीय. चहा विकून पंतप्रधान म्हणायचं आणि दुसरीकडे 10 लाखांचा सूट घालून फिरायचं, मोंदीचं हे वागणं दुटप्पी असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. ते सासवडमध्ये बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, ''भाजपकडून सध्या शिवसेनेला संपवण्याचं षडयंत्र सुरू आहे, पण त्यांना शिवसेना अजून माहित नाही, 2019ला भाजपच कुठे दिसणार नाही, शिवसेना स्वतःच्या बळावर राज्यात सत्तेवर येईल आणि उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील, आघाडीच्या काळात जनतेच्या मनात रोष होता, तोच रोष भाजप सरकारविरोधातही त्यामुळे महाराष्ट्राची जनताच आता भाजपला सत्तेवरून दूर करेल''

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2017 08:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close