शिवसेनाच करणार रामाची वनवासातून मुक्तता, संजय राऊत यांची अयोध्येत भाजपवर टीका

शिवसेनाच करणार रामाची वनवासातून मुक्तता, संजय राऊत यांची अयोध्येत भाजपवर टीका

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना रामाला वनवासातून मुक्त करणार असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

  • Share this:

अयोध्या, ता. 12 ऑक्टोबर : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पूर्व तयारीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत शुक्रवारी अयोध्येत दाखल झाले. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच बाबरी मशीद पाडण्यात आली. आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना रामाला वनवासातून मुक्त करणार असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. रामलालाचं दर्शन घेऊन त्यांनी राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांची भेट घेतली.

राम मंदिराच्या मुद्यावर लक्ष वेधण्यासाठी उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार असल्याची घोषणा शिवसेनेने केली होती. दसरा मेळाव्यात त्यांच्या दौऱ्याची तारिख घोषीत होणार आहे. त्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी संजय राऊत अयोध्येत आले होते. सत्येंद्र दास यांच्यासह त्यांनी स्थानिक नेत्यांच्या भेटी घेतल्या.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीसाठी आणि भाजपला टार्गेट करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा दौरा असल्याचं बोललं जातंय. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं आश्वासन भाजप आपल्या प्रत्येक जाहीरनाम्यात देत असतो. बहुमताने सत्ता येऊनही गेल्या चार वर्षात मंदिर बांधण्याबाबत फार काही प्रगती झाली नाही.

त्यामुळं शिवसेनेनं भाजपवर हल्लाबोल केलाय. तर हे प्रकरण न्यायालयात आहे. सामापचाराने किंवा न्यायालयाच्या मार्गाने हा प्रश्न सुटावा अशी भाजपची भूमिका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही हेत मत आहे. त्यामुळं उशीर होत असला तरी तो शाश्वत मार्ग असल्याचं भाजपने म्हटलं आहे. त्यामुळं आता राम मंदिराच्या प्रश्नावरही भाजप शिवसेना आमने-सामने येणार अशीच शक्यता आहे.

 

First published: October 12, 2018, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading