बुलढाणा, 16 फेब्रुवारी : 14 नोव्हेंबरला जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी अवंतीपुरामध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान शहीद झाले. या हल्ल्यात बुलडाण्याच्या दोन सुपुत्रांना वीरमरण आलं. मलकापूरचे संजय राजपूत आणि लोणारचे नितीन राठोड यांनी देशासाठी प्राण अर्पण केले. या दोन्ही वीरपुत्रांवर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले मूळचे बुलडाण्याचे जवान संजय राजपूत यांना अखेरचा निरोप देण्यात आला. मूळगावी मलकापूरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मलकापूरच्या रहिवाशांनी संजय राजपूत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी केली होती.
रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एवढंच नव्हे तर काही जण झाडांवर देखील चढलेले पाहायला मिळाले. संजय राजपूत अमर रहेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. संजय राऊत यांनी तब्बत 23 वर्षे देशसेवेसाठी अर्पण केली आहेत.
संजय यांच्या पश्चात त्यांची पत्नी, २ मुलं आणि २ भाऊ असा परिवार आहे. दरम्यान पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आणि संजय राजपूत यांना मानवंदना देण्यासाठी मलकापूरमधल्या मुस्लीम बांधवांनी रॅली काढली होती.
मलकापूरच्या संजय राजपूत यांच्याप्रमाणे देशासाठी प्राण अर्पण करणारे बुलडाण्याचे दुसरे सुपुत्र म्हणजे नितीन राठोड. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या नितीन राठोड यांचं पार्थिव दुपारच्या सुमारास त्यांच्या मूळगावी म्हणजे लोणारमध्ये दाखल झालं.
राठोड यांच्या अंत्यसंस्कारावेळी पंचक्रोशी लोणारमध्ये लोटली होती. राठोड शहीद झाल्याचं वृत्त कळताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं. संपूर्ण गाव नितीन राठोड यांना दादा नावानं ओळखायचं. मात्र दहशतवादी हल्ल्यात लोणारचा दादा शहीद झाला. गावातल्या प्रत्येक घरचा सदस्य हरपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
काश्मीरमध्ये पुन्हा IEDचा स्फोट; मेजर शहीद, सर्च ऑपरेशन जारी
संपूर्ण देशाला हादरवून ठेवणाऱ्या पुलवामा हल्ल्यामध्ये 42 जवान शहीद झाल्याच्या 2 दिवसानंतरच एलओसीच्या राजौरीमध्ये आणखी एक आयईडी ब्लास्ट झाला आहे. या स्फोटामध्ये सैन्यातील एक अधिकारी शहीद झाले आहेत.
शनिवारी संध्याकाळी एलओसीजवळ पेट्रोलिंग पार्टीजवळ हा स्फोट झाला आहे. पण अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. पण नेमका हा स्फोट कसा झाला याचा आता तपास सुरू आहे.
हेही वाचा : #PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लिपटून येईन'
दहशतवाद्यांना कुठे, कधी आणि कशी शिक्षा द्यायची हे भारतीय जवानच ठरवतील - PM मोदी
भारताच्या फाळणीनंतर जन्माला आलेला पाकिस्तान हा देश म्हणजे दहशतवादाचे दुसरे नाव आहे. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यातील भारताच्या जवानांचे बलिदान वाया जाणार नाही. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कुठे, कधी आणि कशी शिक्षा द्यायची हे भारतीय जवानच ठरवतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला आहे.
पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतरचा जनतेमधील आक्रोश मी समजू शकतो. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या जवानांवर पूर्ण विश्वास ठेवा. शहीदांचे बलिदान वाया जाणार नाही. दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. ज्यांनी हा हल्ला केला द्यांना जरूर शिक्षा दिली जाईल, असे देखील मोदींनी सांगितले.
'मुस्लिम बटालियन तयार करा आणि सीमेवर पाठवा'
जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटत आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील नागरिकांनी अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळला आहे. काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आले आहेत. अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी नागरिक करत आहेत. अशातच केंद्र सरकारने मुस्लिम बटालियन तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
VIDEO : ...तर कानाखाली आवाज काढू, पाक कलाकारांवर मनसेचा इशारा