मुंबई काँग्रेस कार्यालय तोडफोडीवरून काँग्रेस-मनसे आमने सामने

मुंबई काँग्रेस कार्यालय तोडफोडीवरून काँग्रेस-मनसे आमने सामने

तसंच काँग्रेस कार्यालयाहून फक्त 25 मीटरवर पोलीस स्टेशन असूनही हा हल्ला झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच आता मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही तर आम्हीच चोख उत्तर देऊ असं म्हणत निरूपम यांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केलं आहे.

  • Share this:

01 डिसेंबर: मनसेला आम्ही चोख उत्तर देऊ अशा  शब्दात काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्यावर संजय निरूपमांनी ट्विट करून  प्रतिक्रिया दिली आहे.

दादरच्या काँग्रेस ऑफिसमध्ये कुणीच नसताना मनसेने हल्ला केला. तसंच कार्यालयाची तोडफोडही केली.आज सकाळी मनसेच्या संदीप देशपांडे यांनी मनसेनेच हल्ला केल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर मनसेच्या कार्यालयाची आणि संदीप देशपांडे यांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दरम्यान या सगळ्यावर संजय निरूपम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  मनसेचा हल्ला हा भ्याड आणि नपुंसक हल्ला असल्याची टीका संजय निरूपमांनी केली आहे. तसंच काँग्रेस कार्यालयाहून फक्त 25 मीटरवर पोलीस स्टेशन असूनही हा हल्ला झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.  तसंच आता मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही तर आम्हीच चोख उत्तर देऊ असं म्हणत निरूपम यांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केलं आहे.

दरम्यान पोलीसही तपास करत असून याप्रकरणी तीन मनसैनिकांना अटक करण्यात आली आहे.त्यामुळे आता मनसे-काँग्रेस वाद अजून चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 12:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading