मुंबई, 16 जुलै : मुंबईतला पाऊस आणि खड्डे म्हणजे 'जनता खड्ड्यात आणि मंत्री तोऱ्यात' अशी म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड इथं मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी खड्डे भरा आंदोलन केलं. मुंबईतील ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे जर कोणाचा मृत्यू झाला तर मी उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनपा आयुक्त आणि महापौर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करेण असा इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे.
तर दुसरीकडे, मुंबईतील खड्डे मुंबई मनपा आणि राज्य सरकारनं बुजवले नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. खड्डे बुजवा नाही तर जनतेच्या रोषाला सामोरे जा असाही इशारा देशपांडे यांनी दिला आहे.
त्यामुळे सगळ्यांनीच आंदोलन करायचं तर रस्त्यांची कामं कोण करणार असा प्रश्न आता जनतेकडून विचारला जातोय. दरम्यान, या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. पण तरीही 'खड्यांची जबाबदारी ही महापालिकेची आहे. 5 बळी जरी गेले असले तरी त्या रस्त्यांवरून 5 लाख लोक घरी सुरक्षित जातात ना...' असं अजब विधान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे या जनतेने आता कोणाकडे पहायचं असा प्रश्न आहे.
हेही वाचा...
तिकीट विंडोवरून खरेदी केलेलं ट्रेनचं तिकीट मोबाईलवरून कसं कराल रद्द?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heavy Rain, Maharashtra road accident, Mumbai, Photo, Potholes death, Road, Sanjay nirupam, Video