News18 Lokmat

नाराज संजय काकडेंची मनधरणी करण्यात मुख्यमंत्र्यांना यश येणार?

संजय काकडे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 09:28 AM IST

नाराज संजय काकडेंची मनधरणी करण्यात मुख्यमंत्र्यांना यश येणार?

पुणे, 22 मार्च : पुण्यातील भाजप समर्थक राज्यसभा खासदार संजय काकडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी ही भेट होणार आहे. दरम्यान, संजय काकडे यांनी पत्नीसाठी लोकसभेची उमेदवारी मागितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नाराज संजय काकडे काँग्रेसच्या वाटेवर आहेत. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संजय काकडे आपल्या निर्णयावर ठाम राहणार का? हे पाहावं लागणार आहे.

देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका होणार असून 23 मे रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे 2019मध्ये मतदार राजा कुणाला कौल देणार हे पाहावं लागणार आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपनं युती केली आहे. तर, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील लोकसभेसाठी आघाडी केली आहे. शिवाय, राज्यात वंचित बहुजन आघाडी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्यामुळे रंगतदार होणाऱ्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहावं लागणार आहे.


'NDAचा विजय पक्का, पवार आणि मायावतींच्या माघारीचे तेच संकेत'


Loading...

भाजपची पहिली यादी जाहीर

गुरूवारी सत्ताधारी भाजपने लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत देशातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. याआधीच भाजपने लोकसभेसोबत होणाऱ्या काही राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठीची यादी जाहीर केली आहे. नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी 20 राज्यातील 182 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.


महत्त्वाचे उमेदवार

वाराणसी- नरेंद्र मोदी

गांधीनगर- अमित शहा

लखनऊ- राजनाथ सिंह

नागपूर- नितीन गडकरी

अमेठी- स्मृती इराणी

SPECIAL REPORT : रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर, पण शिवसैनिकांनी घेतला 'हा' पवित्रा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 09:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...