गुजरात निकालाबाबत काकडेंचे 'आकडे' चुकले ; मोदी हिरो, काकडे झीरो !

गुजरात निकालाबाबत काकडेंचे 'आकडे' चुकले ; मोदी हिरो, काकडे झीरो !

गुजरात निवडणुकीत भाजप हरणार असं भाकीत करून चर्चेत आलेले भाजपचे खासदार संजय काकडे यांनी गुजरात निकालानंतर मोदी हेच खरे हिरो असल्याचं प्रांजळपणे कबुल केलंय, ''होय, मोदी हिरो, काकडे झीरो, हे मी मान्य करतो,'' अशा शब्दात संजय काकडेंनी प्रतिक्रिया देत गुजरात निवडणुकीबाबत आपले आकडे चुकल्याचं मान्य केलंय.

  • Share this:

18 डिसेंबर, पुणे : गुजरात निवडणुकीत भाजप हरणार असं भाकीत करून चर्चेत आलेले भाजपचे खासदार संजय काकडे यांनी गुजरात निकालानंतर मोदी हेच खरे हिरो असल्याचं प्रांजळपणे कबुल केलंय, ''होय, मोदी हिरो, काकडे झीरो, हे मी मान्य करतो,'' अशा शब्दात संजय काकडेंनी प्रतिक्रिया देत गुजरात निवडणुकीबाबत आपले आकडे चुकल्याचं मान्य केलंय. पण गुजरातसंबंधीचा आपला एक्झिट पोल चुकला असल्याचं काकडे अजूनही मान्य करायला तयार नाहीत.

गुजरातच्या निवडणुकीत मोदींचा करिश्मा चालला तर भाजप 22 वर्षांच्या अॅन्टीकबन्सीवर मात करेल असं मी म्हटलं होतं आणि त्याप्रमाणेच गुजरातचे निकाल आलेत, असा दावा संजय काकडेंनी केलाय. गुजरातच्या निवडणुकीचं सारं श्रेय मोदींनाच जात असल्याचं संजय काकडे म्हणालेत. पण निकालाआधी मोदी -शहांना अपशकून करणाऱ्या संजय काकडेंबाबत भाजप नेतृत्वं आता नेमका काय निर्णय घेणार हेच पाहावं लागणार आहे. दरम्यान, पुणे मनपात काकडेंना दूर ठेवलं गेल्यामुळेच त्यांनी भाजप विरोधात विधानं केल्याचं बोललं जात होतं. त्यावर अधिकचं भाष्य करणं काकडेंनी यावेळी टाळलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2017 03:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading