संजय दत्तला 8 महिन्याआधी का सोडलं ?, हायकोर्टाने राज्य सरकारकडे मागितला खुलासा

. संजय दत्त जेलमध्ये असताना अर्धावेळ तर पॅरोलवर बाहेर होता मग त्याची वर्तणूक चांगली होती हे कसं काय कळालं असा सवालही कोर्टाने विचारला आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2017 06:47 PM IST

संजय दत्तला 8 महिन्याआधी का सोडलं ?, हायकोर्टाने राज्य सरकारकडे मागितला खुलासा

12 जून : सिनेअभिनेता संजय दत्त याला आठ महिने आधी सोडण्याचा निर्णय का घेण्यात आला याचं उत्तर राज्य सरकारनं देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तने येरवडा तुरुंगात शिक्षा भोगून बाहेर आला. पण संजय दत्तला आठ महिने लवकर सोडण्यात आलं आणि त्याला सतत देण्यात आलेले पॅरोल याला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली.

आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने राज्य सरकारकडून संजय दत्तच्या सुटकेबद्दल खुलासा मागितलाय. संजय दत्त जेलमध्ये असताना अर्धावेळ तर पॅरोलवर बाहेर होता मग त्याची वर्तणूक चांगली होती हे कसं काय कळालं असा सवालही कोर्टाने विचारला आहे.

संजयला ८ महिने आधी सोडताना कोणते निकष लावण्यात आले, कोणती प्रक्रिया वापरण्यात आली, पोलीस महानिरीक्षक कारागृह यांचा याबद्दलचा सल्ला घेण्यात आला होता की कारागृह अधीक्षकांनी परस्पर अहवाल राज्यपालांना पाठवला असा सवाल कोर्टाने विचारलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 06:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...