Tik Tokच्या स्कल चॅलेंजमुळे सांगलीत विद्यार्थी गंभीर जखमी, तुमची मुलं तर नाही करत अशी चूक?

Tik Tokच्या स्कल चॅलेंजमुळे सांगलीत विद्यार्थी गंभीर जखमी, तुमची मुलं तर नाही करत अशी चूक?

Tik Tok वरील स्कल ब्रेकर चॅलेंज म्हणजे जीवाशी खेळ आहे. पण आताची मुलं सहपणे जीवाशी खेळ करतात. असाच प्रकार सांगलीमध्ये घडला आहे.

  • Share this:

सांगली, 19 फेब्रुवारी : सध्या Tik Tok ने संपूर्ण तरुणाईला वेड लागलं आहे. टिकटॉकच्या व्हिडिओ आणि टिकटॉक चॅलेंज देशात ट्रेंडिंगमध्ये आहे. पण या सोशल मीडियाचा जितका फायदा आहे तितकाच धोकासुद्धा आहे. टिकटॉकच्या जीवघेण्या चॅलेंजमुळे सांगलीमध्ये एक मुलगा गंभीर जखमी झाल्याचं समोर आलं आहे. टिकटॉकमध्ये सध्या स्कल चॅलेंज व्हायरल होत आहे. हेच चॅलेंज करताना शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

Tik Tok वरील स्कल ब्रेकर चॅलेंज म्हणजे जीवाशी खेळ आहे. पण आताची मुलं सहपणे जीवाशी खेळ करतात. असाच प्रकार सांगलीमध्ये घडला आहे. काही शाळकरी मुलांना स्कल चॅलेंज करताना गंभीर दुखापत झाली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याचा हात मोडला तर पायाला आणि डोक्यालाही दुखापत झाली आहे.

तीन मुलांनी किंवा मुलींनी एकत्र उडी मारल्यानंतर दोन्ही बाजूला उभे राहिलेल्यांनी मधल्या मुलाच्या पायावर मारून त्याला पाडण्याचा प्रयत्न करायचा असं हे स्कल ब्रेकर चॅलेंज आहे. याचे अनेक व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करण्यात आले आहेत. आता सगळेजण या व्हिडिओचं अनुकरण करतात. पण त्याने जीवाला धोका आहे.

खरंतर हे चॅलेंजचं धोकादायक अजून भारतातच नाही तर इतर देशांमध्येही यामुळे अपघात झाल्याचं समोर आलं आहे. हे चॅलेंज करू नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं. यावर विराटने शेअर केलेल्या एका फोटोचा वापर करून नागपूर पोलिसांनी पालकांना एक सल्ला दिला होता. स्कल ब्रेकर चॅलेंजचा धुमाकूळ सोशल मीडियावर आहे. ते करू नका नाहीतर अशी अवस्था होईल असं नागपूर पोलिसांनी म्हटलं होतं.

'Use your अक्कल to save the skull'

जीवाला धोका असणारं हे चॅलेंज करू नका असा वारंवार सुचना देत आहे. महाराष्ट्र पोलिसांनीदेखील स्कल ब्रेकर चॅलेंज करू नका असं आवाहन नेटकऱ्यांना ट्वीट करून दिलं आहे. यासोबत त्यांनी एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. हेच ट्वीट पुणे पोलिसांनीदेखील रिट्विट केलं आहे.

या ट्वीटमध्ये 'Save your natural helmet from man-made calamities. Say No To #SkullBreakerChallenge ' असं लिहिण्यात आलं आहे.

First published: February 19, 2020, 11:26 AM IST

ताज्या बातम्या