सांगलीत कुत्रा पाळायचा असेल तर द्यावे लागणार 5 हजार, नागरिक काढणार श्वान मोर्चा!

सांगलीत कुत्रा पाळायचा असेल तर द्यावे लागणार 5 हजार, नागरिक काढणार श्वान मोर्चा!

सांगली महापालिकेच्या एका प्रस्तावानं श्वान प्रेमी नागरिक संतप्त झाले आहेत. महापालिकेनं पाळीव कुत्रे पाळणाऱ्यांना पाच हजार कर लावण्याचा प्रस्ताव तयार केल्यानं सर्वच स्तरातून त्याचा विरोध होतोय.

  • Share this:

आसिफ मुरसल,प्रतिनिधी

सांगली,ता.17 एप्रिल: सांगली महापालिकेच्या एका प्रस्तावानं श्वान प्रेमी नागरिक संतप्त झाले आहेत. महापालिकेनं पाळीव कुत्रे पाळणाऱ्यांना पाच हजार कर लावण्याचा प्रस्ताव तयार केल्यानं सर्वच स्तरातून त्याचा विरोध होतोय.

अनेक प्रकारच्या मोर्चांनी ढवळून निघालेल्या सांगलीत बुधवारी एक अनोखा श्वान मोर्चा निघणार आहे. कारण सांगली महापालिकेनं पाळीव कुत्र्यांना 5 हजारांचा कर लावल्यानं श्वान प्रेमी संतप्त झालेत.

पाळीव कुत्र्यांना 5 हजारांचा कर लावण्याचा प्रस्ताव येत्या 20 एप्रिलच्या महासभेसमोर ठेवण्यात येणारय. शहरात सुमारे 20 ते 25 हजाराहून अधिक पाळीव कुत्री आहेत. त्यातून पालिकेला किमान 12 ते 25 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

इतर शहरांमध्ये असा आहे कर

मुंबई 100

पुणे 75

कोल्हापूर 25

नागपूर 200

नाशिक 100

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2018 10:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading