मुलीला मारलं म्हणून सासऱ्याने घेतला जावयाचा जीव

मुलीला मारलं म्हणून सासऱ्याने घेतला जावयाचा जीव

मुलीला मारहाण केली म्हणून सासऱ्याने जावयाला डांबून मारहाण केली. या मारहाणीत जावयाचा मृत्यू झालाय, तर मुलगी अत्यवस्थ ही आहे.

  • Share this:

सांगली, 8 डिसेंबर : मिरज तालक्यातील सावळीमध्ये एक धसक्कादायक घटना घडली आहे. मुलीला मारहाण केली म्हणून सासऱ्याने जावयाला डांबून मारहाण केली. या मारहाणीत जावयाचा मृत्यू झालाय, तर मुलगी अत्यवस्थ ही आहे. मध्यरात्री 3 वाजता घडलेल्या या घटनेमुळे सावळी गावात एकच खळबळ उडाली आहे.

जानेश्वर बामणे हे मुळचे जत तालुक्यातील बसर्गी येथील रहिवासी. सावळी येथे जत्रा असल्याने ते काल (शुक्रवारी) सासारवाडीला आले होते. रात्री जानेश्वर बामणे आणि गीतांजली बामणे या दोघांत कडाक्याचं भांडण झालं. या भांडणात गीतांजलीच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्याचवेळी मुलीला मारहाण केली म्हणून तिचे वडील अण्णांसो शिंदे यांनी जावयाला डांबून त्याला जबर मारहाण केली.

या मारहाणीत जानेश्वर बामणे हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर जानेश्वर आणि गितांजली या दोघांना मिरज येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान जानेश्वर बामणे यांचा मृत झाला. गीतांजलीची प्रकृती अत्यवस्थ असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मध्यरात्री 3 वाजता घडलेल्या या घटनेची वार्ता लगेच गावात पसरली आणि ग्रमस्थ गोळा झाले. कुपवाड पोलीस सकाळी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास पोलीस करीत आहेत. माहिती मिळताच गावाचे सरपंच श्रीकांत डोंगरे आणि डीवायएसपी अनिल पवार घटनास्थळी दाखल झाले होते.

 लेफ्ट हँड ड्राईव्ह बसची टेम्पोला भीषण धडक, 2 जण जागीच ठार

First published: December 8, 2018, 6:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading