'अश्लील सीडी'च्या वादातूनच मालकाने अनिकेतला पोलिसांकरवी संपवलं, कुटुंबियांचा आरोप

'अश्लील सीडी'च्या वादातूनच मालकाने अनिकेतला पोलिसांकरवी संपवलं, कुटुंबियांचा आरोप

पोलिसांच्या मारहाणीत मृत झालेल्या अनिकेत कोथळे याच्याविरुद्ध लुबाडणुकीचा खोटा गुन्हा दाखल करण्यामागे सांगलीतील व्यापारी नीलेश खत्री यांचा हात आहे, असा आरोप अनिकेतचा भाऊ आशिष कोथळे याने केला आहे. निलेश खत्रीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अश्लील चित्रफितीचं एक प्रकरण अनिकेतला कळलं म्हणून, अनिकेतला खोट्या गुन्ह्यात अडकवून संपवलं, असा ही आरोप अनिकेतचा भाऊ आशिष कोथळे याने केला आहे.

  • Share this:

सांगली, 11 नोव्हेंबर : पोलिसांच्या मारहाणीत मृत झालेल्या अनिकेत कोथळे याच्याविरुद्ध लुबाडणुकीचा खोटा गुन्हा दाखल करण्यामागे सांगलीतील व्यापारी नीलेश खत्री यांचा हात आहे, असा आरोप अनिकेतचा भाऊ आशिष कोथळे याने केला आहे. निलेश खत्रीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अश्लील चित्रफितीचं एक प्रकरण अनिकेतला कळलं म्हणून, अनिकेतला खोट्या गुन्ह्यात अडकवून संपवलं, असा ही आरोप अनिकेतचा भाऊ आशिष कोथळे याने केला आहे. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यानंतर सीआयडी पोलिसांनी सांगलीतील लकी बॅग या दुकानावर तातडीने छापा घालून दुकानाची तपासणी केली. गृहविभागाने अनिकेतच्या खून प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार हे सांगलीत दाखल झाले आहेत.

दरम्यान, सांगलीच्या अनिकेत कोथळे कोठडीत मृत्यू प्रकरणात 7 पोलिसांचं निलंबन झालंय. याआधी 6 पोलिसांना अटक झाली होता. त्यामुळे आता कारवाई झालेल्या पोलिसांची संख्या 13 झालीये. आताच्या कारवाईत ठाणे अंमलदार, अंमलदारांचा मदतनीस, 4 गार्ड्स आणि वायरलेस ऑपरेटरना निलंबित करण्यात आलंय. या प्रकरणात दोषींवर कारवाई होणारंच, असं मुख्यमंत्र्यांनी कालच म्हटलं होतं. अनिकेत कोथळेवर चोरीचा आरोप होता, त्याला रविवारी अटक झाली होती. पण कोठडीत जबर मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांचा क्रूरपणा इथेच थांबला नाही, तर त्याचा मृतदेह अंबोली घाटात नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला गेला. मृतदेह जळत नाही हे पाहिल्यावर परत दुसऱ्यांदा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता.

अनिकेतच्या कुटुबियांना सांगितलेला घटनाक्रम-

अनिकेत हा हरभट रोडवरील नीलेश खत्री या व्यापाऱ्याच्या लकी बॅग हाऊसमध्ये काही महिन्यांपूर्वी नोकरीला लागला. पगारावरुन त्याचा खत्रीशी वाद झाला. त्यानंतर अनिकेतने गल्ल्यातील रोकड लंपास केल्याचा आरोप खत्री याने केला. त्याने पोलिसांना बोलावून घेतले. अनिकेतला पोलिस ठाण्यात नेले. त्यावेळी गिरीश लोहाना यांनी खत्री याची बाजू घेऊन, अनिकेतवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण यासंदर्भात कोणतेही पुरावे न मिळाल्याने हे प्रकरण सामोपचाराने मिटविण्यात आले होते. पण, नंतर ४ नोव्हेंबरला सायंकाळी 7 वाजता अनिकेतवर त्याचा मालक खत्रीला लुबाडल्याचा आरोप झाला, त्याच गुन्ह्याच पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतल्याने अनिकेत रविवारी दुसऱ्यादिवशी अनिकेत घरी आलाच नाही. सोमवारी पहाटे पोलिसांनी आमच्या घरी फोन करून, अनिकेतला जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती दिली.

नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी केली. पण अनिकेतविरुद्ध कोणी फिर्याद दिली, याची विचारणा करुनही पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. घाईगडबडीने त्याला अटक करुन तातडीने न्यायालयात उभे केले. पोलिस कोठडीमिळविण्यासाठी पोलिसांनीच वकील दिला. तीन दिवसांची पोलिस कोठडीही घेतली. त्याला जामीन मिळू नये, यासाठीच हे नियोजन केले होते. कामटे, त्याचे पथक, ठाणे अंमलदार, व्यापारी नीलेश खत्री आणि मध्यस्थ गिरीश लोहाना या सर्वांच्या संगनमतानेच अनिकेतचा घातपात झाला आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडेही केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2017 12:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading