Home /News /news /

'मुलींचं लग्न करायचं हो, समाजात घ्या'

'मुलींचं लग्न करायचं हो, समाजात घ्या'

पण जात पंचायतीने आणखी मला 2 लाखाचा दंड सुनावण्यात आला आहे.

    आसिफ मुरसल, सांगली, 31 आॅगस्ट : पुरोगामी महाराष्ट्र म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्रमध्ये आज ही बहिष्कृत सारख्या घटना घडत आहेत. अशीच घटना सांगली जिल्ह्यातील जत मध्ये घडली आहे. केवळ लग्नाच्या कार्यातून या मरी आई ( कडकलक्ष्मी ) समाजातील कोळी दाम्पत्यांना गेल्या ४० वर्षापासून वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामीण भागात जात पंचायत आणि बहिष्कृत सारख्या घटना घडत असतात. पूर्वीच्या काळी असे प्रकार सर्रास घडत होते. मात्र 21 व्या शतकात ही असे प्रकार घडत आहेत. ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे. अशीच घटना सांगली जिल्ह्यातील जतमध्ये घडली आहे. मारुती कोळी हे 70 वर्षाचे आहेत. त्याच्या दोन पत्नी आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचे लहानपणी एका माणसाशी लग्न करून दिले होते. पण तो मोठा झाल्यावर दारू पिऊ लागल्याने सासऱ्याने हे लग्न मला अमान्य आहे असं सांगितलं आणि पत्नी बुध्दाव्वा हिचे लग्न माझ्याशी लावून दिलं. हे लग्न जात पंचायतला मान्य नव्हतं, त्यांना न सांगता हे लग्न केलं. आणि मला त्यांनी 1 लाख रुपये दंड सुनावलं. पण हा दंड मी आज तागायत भरला. मारुती कोळी यांना दोन मुली आहेत, त्यांची लग्न करायची आहेत पण वाळीत टाकल्यामुळे कोण ये जा करत नाही. त्यासाठी पुन्हा एकदा जात पंचायतकडे मला समाजात घ्या अशी दाद मागितली. पण जात पंचायतीने आणखी मला 2 लाखाचा दंड सुनावण्यात आला आहे.  मारुती कोळी यांच्या कुटुंबांना कोणत्याही लग्न कार्य अथवा अंत्यविधी आणि इतर समाज कार्यात त्यांना बोलावलं जात नाही किंवा सहभाग घेऊन दिला जात नाही. आज त्याच्या मुली मोठ्या झाल्या आहेत. त्याची लग्न होत नाहीत. त्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टीला कंटाळून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आज सांगली पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर ही बाब उघडकीस आली.  ------------------------------------------------------------------------------- VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या
    First published:

    Tags: Sangali, Sangali news, Sangali video, जात पंचायत, सांगली

    पुढील बातम्या