सांगलीच्या अनिकेत कोथळेवर दोन महिन्यांनी अंत्यसंस्कार !

सांगलीच्या अनिकेत कोथळेवर दोन महिन्यांनी अंत्यसंस्कार !

पोलीस कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहावर अखेर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूनंतर 65 दिवसांनी अनिकेतचा मृतदेह पंचत्वात विलिन झाला. तब्बल दोन महिने पाच दिवसांनंतर सांगलीच्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहाला अग्नी देण्यात आला. अनिकेत कोथळेची 6 नोव्हेंबर 2017ला विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कोठडीत हत्या करण्यात आलीय.

  • Share this:

11 जानेवारी, सांगली : पोलीस कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहावर अखेर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूनंतर 65 दिवसांनी अनिकेतचा मृतदेह पंचत्वात विलिन झाला. तब्बल दोन महिने पाच दिवसांनंतर सांगलीच्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहाला अग्नी देण्यात आला. अनिकेत कोथळेची 6 नोव्हेंबर 2017ला विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कोठडीत हत्या करण्यात आलीय. सांगलीच्या पोलीस कोठडीत अनिकेतची पोलिसांनी एका व्यापाऱ्यांच्या सांगण्यावरून हत्या केली होती. सांगली पोलिसांनीच हे हत्याकांड घडवून आणल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातले सर्व आरोपी आता गजाआड आहेत. सीआयडीमार्फत या हत्याकांडाचा तपास सुरू आहे.

आरोपी पोलिसांनी अनिकेतच्या मृतदेहाची आंबोली घाटात विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. जेव्हा अनिकेतच्या हत्याकांडाला वाचा फुटली तेव्हा सीआयडीच्या टीमनं आंबोली घाटातून अनिकेतच्या मृतदेहाचे अवशेष हस्तगत केले. हे अवशेष गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या फॉरेन्सिक तपासण्यांसाठी मिरजच्या मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले होते. अखेर हे अवशेष आज कोथळे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर अनिकेतच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणातल्या आरोपी पीएसआय युवराज कामटे आणि इतर आरोपी पोलीस सीआयडी कोठडीत आहेत. तर डीवायएसपीची खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे. आरोपींवर लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून त्यांच्यावर खटला चालावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा केली जावी अशी अपेक्षा कोथळे कुटुंबीयांनी व्यक्त केलीय.

First published: January 11, 2018, 6:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading