Home /News /news /

Pune : भांगेपासून केलेलं सँडविच कधी खाल्लंय? पुण्यातल्या 'म्युझियम कॅफे'मध्ये मिळणाऱ्या भन्नाट पदार्थांचा VIDEO

Pune : भांगेपासून केलेलं सँडविच कधी खाल्लंय? पुण्यातल्या 'म्युझियम कॅफे'मध्ये मिळणाऱ्या भन्नाट पदार्थांचा VIDEO

title=

भारतातील पहिले 'द हेम्प कॅफे म्युझियम', ज्यामध्ये चक्क भांगेपासून सँडविच (sandwich) आणि इतर पदार्थ बनवले जातात. पुण्यातील अमृता शितोळे या तरुणीचा स्तुत्य स्टार्टअप!

    पुणे 31, मे : आजवर तुम्ही सर्वांनी कॅफे आणि सॅंडविच (sandwich) वर्कर पाहिले असतील. काही कॅफेमध्ये म्युझियमदेखील पाहिले असतील, त्याचा आनंदही घेतला असेल. पण, असं कधी ऐकलं किंवा पाहिलंय का की, एखाद्या कॅफेमध्ये चक्क भांगेपासून तयार केलेले पदार्थ मिळातात? नाही ना? चला तर आज पुण्यातील एका तरुणीने चक्क भांगेपासून सॅंडविच आणि बर्गर तयार करणारा 'दे हेम्प कॅफे' (The Hemp Cafe in pune) सुरू केला आहे, ते जाणून घेऊया... पुण्यातील अमृता शितोळे हिने भारतातील पहिले 'द हेम्प कॅफे' नावाचे भांगेपासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांचा कॅफे सुरू केला आहे. आता भांग म्हटलं की नशा आली, त्याला कायदेशीर मान्यताही नाही, असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण होऊ शकतात. याबाबत अमृताशी संवाद साधला असता तिने सांगितले की, "भांगेच्या झाडांच्या पानांपासून मेडिसिन किंवा मादक पदार्थ तयार केले जातात. मात्र, आमच्या कॅफेमधे जे काही पदार्थ बनतात ते भांगेच्या बियापासून बनवलेले असतात. भांगेच्या बिया या नशेच्या नसतात तर त्या न्यूट्रिशन आणि प्रोटीन युक्त असतात." (This cafe makes sandwiches and burgers from cannabis) वाचा : आपल्या आरोग्यासाठी खूपच घातक असतात हे 5 'फूड कॉम्बिनेशन'; कधीही ... याबाबत अधिक माहिती देताना अमृता सांगते की, "या बियांपासून नशा होत नाही. मात्र, आपल्या शरीराला आवश्यक असे ओमेगा आणि अनेक प्रकारचे उपयुक्त न्यूट्रिशन व प्रोटिन्स बियांपासून मिळतात. जेवढे फायदे माशांच्या तेलाचे आहेत, त्याहून अधिक फायदे या भांगेच्या बियांचे आहेत. यामुळे या कॅफेमध्ये खाल्लेले बर्गर (Burger) आणि सँडविचदेखील (sandwiches) तुम्हाच्या शरीरासाठी प्रोटिन्स देणारे ठरतात." तर या अनोख्या कॅफेमध्ये फक्त तुम्हाला फक्त पदार्थच मिळणार नाहीत, तर भांगेबद्दलचे समाजात जे गैरसमज पसरलेले आहेत ते दूर करण्यासाठी अमृताने म्युझियमदेखील तयार केलेले आहे. या म्युझियमच्या माध्यमातून  भांगेबद्दल गैरसमज दूर होण्यास मदत होते. जसे की, भांग हे एखाद्या कल्पवृक्षासारखे काम करते. भांगेपासून आपल्याला कापूस मिळू शकतो. तसेच कागद बनवणे प्लायवूड बनवणे. एवढेच नाही तर, पेट्रोलियम पदार्थदेखील भांगेपासून बनवता येऊ शकतात, अशी माहिती या म्युझियममध्ये आपल्याला पाहायला मिळते. वाचा : Career Tips: तुम्हालाही Food Inspector व्हायचंय? मग शिक्षणापासून ... "माणसाच्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असणारे झाड आपल्याकडे मादक पदार्थांच्या निर्मितीमुळे बदनाम झाले आहे", अशी खंत यावेळी अमृताने बोलून दाखवली. "खरंतर आपल्या इथे अनेक आयुर्वेदिक औषधांच्यामध्ये भांगेचा वापर केला जातो. तसेच पूर्वी 'फोर्ड' मोटारदेखील भांगेच्या फायबरपासून तयार करण्यात आली होती. अमेरिकेसारख्या देशांमध्ये भांगेपासून विविध पदार्थ आणि उत्पादने घेतली जातात. मात्र ही मूळची भारतीय वनस्पती असून देखील आपण हवे तसे या वनस्पतीकडे लक्ष दिले नाही. खरंतर ही वनस्पती अतिशय उपयुक्त  असून याचा वापर करणे गरजेचे आहे", असे अमृताने सांगितलं.
    First published:

    पुढील बातम्या