मायक्रोएसडी कार्डच्या विश्वातही क्रांती; 'या' कंपनीने लाँच केलं 1TB मेमरी कार्ड

मायक्रोएसडी कार्डच्या विश्वातही क्रांती; 'या' कंपनीने लाँच केलं 1TB मेमरी कार्ड

1 TB चं मेमरी कार्ड भारतात लाँच झालेल्या 'या' स्मार्टफोन्समध्ये वापरता येईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मे : युएसची कंपनी 'सॅनडिस्क'ने जगातलं पहिलं 1 TB मायक्रोएसडी कार्ड लाँच केलं आहे. इतर तंत्रज्ञानाप्रमाणेच आता मायक्रोएसडी कार्डच्या विश्वातही क्रांती व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भविष्यात डाटा स्टोअर करणं आणखी सोपं होणार आहे. सॅनडिस्कने लाँच केलेलं 'हे' मेमरी कार्ड सुरूवातीला अमेरिका, स्पेन आणि जर्मनीत उपलब्ध केलं जाणार आहे. त्यानंतर भारतासह इतर देशांतील लोकांना ते ऑनलाईन खरेदी करता येईल, असं कंपनीने म्हटलं आहे.

किंमत - 'सॅनडिस्क' कंपनीचं हे पावरफुल मेमरी कार्ड ग्राहकांना Amazon वर ऑनलाईन खरेदी करता येईल. या 1 TB माइक्रोएसडी कार्डची किंमत संद्या 450 डॉलर म्हणजेच 31500 रुपये अशी आहे.

Oppoच्या 'या' स्मार्टफोनमध्ये आहे 48MP चा कॅमेरा; 'ही' आहेत फीचर्स आणि किंमत

स्पीड - 'सॅनडिस्क'चे हे मेमरी कार्ड जर तुम्ही कॅमेऱ्यात वापरणार असाल तर त्याची रायटिंग स्पीड 90MB/s आणि डेटा रीड करण्याची स्पीड 160 MB/s अशी राहील असं कंपनीने म्हटलं आहे.

जीन्स घालायची आवडत असेल, तर 'या' डेनिम्स तुमच्या वॉर्डरोबमध्ये असालाच हव्यात

या स्मार्टफोनमध्ये वापरता येईल - 'सॅनडिस्क'चं 1 TB माइक्रोएसडी कार्ड भारतात लाँच झालेल्या HTC One ME, LG G Stylo, LG G Flex 2, LG G3, Saygus V2 या स्मार्टफोन्समध्ये वापरता येईल. जवळपास सर्वच मोबाइल कंपन्या आता इतक्या मेमरी कार्डला सपोर्ट करणारे फीचर्स स्मार्टफोनमध्ये देत असल्याने बहुतांश युजर्सना हे कार्ड वापरता येईल असं कंपनीने म्हटलं आहे.

First published: May 18, 2019, 6:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या