Home /News /news /

'तुम बिन ये घर सुना सुना है...' लडाखच्या पर्वतरांगांमध्ये भारतीय सैन्याला अनोखा सलाम; VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल

'तुम बिन ये घर सुना सुना है...' लडाखच्या पर्वतरांगांमध्ये भारतीय सैन्याला अनोखा सलाम; VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल

लडाखमधील हे दोन प्रसिद्ध फोक आर्टिस्ट असून पद्मा डोलकर (Padma Dolkar) आणि स्टॅन्झिन नॉर्गाईस (Stanzin Norgais) असे या कलाकारांचे नाव आहे.

    लडाख, 17 जानेवारी : बॉर्डर (Border) चित्रपटातील ‘संदेसे आते हैं’ (Sandese Aate Hain) हे गाणं न ऐकलेला भारतीय सापडणार नाही. जवळपास सर्वच भारतीय नागरिकांच्या तोंडात हे देशभक्तीपर गाणं अजूनही रुळत आहे. अनेक जणांनी या गाण्याचे विविध व्हर्जन बनवले असून सध्या अशाच पद्धतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये लडाखमधील  व्यक्ती गिटारवर हे गाणं गात असून अतिशय सुंदर पद्धतीने हे गाणं गायलेले आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये लडाखच्या (Ladakh) पर्वतरांगांसमोर बसून गिटार हातात धरून गायक हे गाणं गाताना दिसून येत असून त्याच्याबरोबर एक महिला गायिका देखील त्याला अतिशय उत्तम साथ देत आहे. सैन्य दिवसाच्या (Army Day) निमित्ताने त्यांनी  भारतीय सैन्याला आदरांजली वाहण्यासाठी खास हे गाणं तयार केल्याची माहिती मिळत आहे. लडाखमधील हे दोन प्रसिद्ध फोक आर्टिस्ट असून पद्मा डोलकर (Padma Dolkar) आणि  स्टॅन्झिन नॉर्गाईस (Stanzin Norgais) असे या कलाकारांचे नाव आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया यावर येत आहेत, असं इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. बॉलिवूड कलाकारांपासून विविध क्षेत्रातील व्यक्तींनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली असून हा व्हिडीओ शेअर देखील केला आहे. यामध्ये अभिनेत्री रविना टंडन (Raveena Tondon) हिने भय्याजी नावाच्या ट्विटर युजरने अपलोड केलेला व्हिडीओ शेअर करत ‘माझा भारत’ असं म्हटले आहे. याचबरोबर दर्शना सिंग आणि केजेएस धिल्लन यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर देखील खूप वेगाने व्हायरल होत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच सामान्य युजर्सनी देखील हे गाणं ऐकताना अंगावर काटा येत असल्याची भावना व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ खूपच छोटा असून लवकरच याचे पूर्ण व्हर्जन येण्याची आशा देखील युजर्सनी व्यक्त केली आहे.  हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्टॅन्झिन नॉर्गाईस यांनी ट्विटरवर ट्विट करत आपण शांतीने आणि सामंजस्याने जगत राहावे म्हणून त्यांनी दिलेल्या बलिदानांवर आपले प्रेम व्यक्त करताना खूप छान वाटते. जय हिंद जय भारत! असं म्हटलं आहे. याचबरोबर त्यांनी केलेल्या या छोट्याश्या प्रयत्नाला इतका चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल देखील त्यांनी सर्वांचे आभार मानले. ‘संदेसे आते हैं’ (Sandese Aate Hain) हे गाणं 1997 साली आलेल्या बॉर्डर (Border) या चित्रपटातील आहे. सोनू निगम ( Sonu Nigam) आणि रूप कुमार राठोड (Roop Kumar Rathore) यांनी गायलेलं हे गाणं आजही भारतीयांच्या मनाच्या जवळ आहे. सीमेवर तैनात जवान हवेच्या झुळूकेला आपला संदेश आपल्या घरी पोहोचवायला सांगत आहे असं याच्या चित्रणात दिसून येतं. या व्हिडिओच्या रूपाने पुन्हा एकदा सर्वांच्या आठवणी ताज्या झाल्या.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Indian army

    पुढील बातम्या