घरबसल्या दुरुस्त करून मिळणार स्मार्टफोन आणि टॅब; Samsung ची 46 शहरांमध्ये सुविधा

घरबसल्या दुरुस्त करून मिळणार स्मार्टफोन आणि टॅब; Samsung ची 46 शहरांमध्ये सुविधा

कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) सध्या प्रत्येकालाच घराबाहेर जितकं कमी पडावं लागेल तितकं चांगलं आहे. त्यामुळे कोरोनाची संसर्ग साखळी तोडणे शक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर, भारतातील विश्वासार्ह कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन ब्रँड सॅमसंगनं (Samsung) आपल्या ग्राहकांसाठी एक अभिनव सेवा सुरू केली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल : कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) सध्या प्रत्येकालाच घराबाहेर जितकं कमी पडावं लागेल तितकं चांगलं आहे. त्यामुळे कोरोनाची संसर्ग साखळी तोडणे शक्य होणार आहे. प्रत्येकानं आपल्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी देखील घरातच थांबणे योग्य आहे. या पार्श्वभूमीवर, भारतातील विश्वासार्ह कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन ब्रँड सॅमसंगनं (Samsung) आपल्या ग्राहकांसाठी एक अभिनव सेवा सुरू केली आहे. ज्यामुळे ग्राहकांना घराबाहेर पडावं लागणार नाही. कंपनीच्या या पिक-अप अँड ड्रॉप (Pick-up and Drop) किंवा ओन्ली ड्रॉप (Only Drop) या सुविधेमुळे आता ग्राहकांना आपला स्मार्टफोन (Smartphone) किंवा टॅब (Tablet) खराब झाल्यास तो दुरुस्तीला देण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज भासणार नाही. कंपनीचे कर्मचारी घरी येऊन तुमची बिघडलेली वस्तू घेऊन जातील आणि दुरुस्त झाल्यावर परत आणून देतील. ज्या ग्राहकांनी सर्व्हिस सेंटरवर (Service Centre) आपला स्मार्टफोन किंवा टॅब दिलेला असेल तर असे ग्राहक ओन्ली ड्रॉप (Only Drop) सेवेचा पर्याय निवडून आपला फोन किंवा टॅब घरी मागवू शकतील. या सुविधेमुळे ग्राहकांना घराबाहेर पडण्याचा धोका टाळून घरबसल्या आपला स्मार्टफोन किंवा टॅब दुरुस्त करून घेता येणार आहे.

46 शहरात सेवा उपलब्ध

मोबाइलसाठी कंपनीनं देशातील 46 शहरांमध्ये ही सेवा सुरू केली आहे. यामध्ये दिल्ली, गुरग्राम, मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे, बेंगळूरू, अहमदाबाद, गाझियाबाद, फरीदाबाद, नोएडा, चंदीगड, लुधियाना, जालंधर, जयपूर, उदयपूर, जोधपूर, आग्रा, लखनऊ, वाराणसी, डेहराडून, गुवाहाटी, भुवनेश्वर, पाटणा, दुर्गापूर, रांची, ठाणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, सूरत, बडोदा, भोपाळ, इंदूर, रायपूर, राजकोट, जबलपूर, कोईमतूर, मदुराई, कोची, कालिकत, तिरुपती, हुबळी, हैदराबाद, विजयवाडा आणि विशाखापट्टणम या शहरांचा समावेश आहे. या शहरांच्या नगरपालिका हद्दीतील नॉन कंटेनमेंट झोनच्या बाहेर असणाऱ्या भागात संचारबंदीचे (Curfew) नियम पाळून ही सेवा दिली जाईल.

या डिव्हाइससाठी सेवा दिली जाणार

ग्राहक त्यांच्या गॅलेक्सी ए, गॅलेक्सी एम, गॅलेक्सी एस, गॅलेक्सी एफ, गॅलेक्सी नोट आणि गॅलेक्सी फोल्ड सिरीजचे स्मार्टफोन तसेच टॅबलेट करता ही सेवा घेऊ शकतात. याकरता रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्व सुरक्षा नियम पाळून कंपनीचे कर्मचारी ग्राहकांच्या घरातून स्मार्टफोन किंवा टॅब घेऊन जातील.

या सेवेसाठी किमान 99 रुपये शुल्क

मोबाइलच्या दुरुस्तीसाठी या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर केवळ पिक अँड ड्रॉपकरता 199 रुपये तर फक्त ड्रॉप सेवेकरता 99 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. ग्राहक विविध डिजिटल पेमेंट पर्यायांद्वारे हे शुल्क देऊ शकतात.

कंपनीची भूमिका

सॅमसंग इंडियाच्या ग्राहक सेवा विभागाचे उपाध्यक्ष सुनील कुटीन्हा म्हणाले की, ‘ग्राहक हिताला सॅमसंगची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळेच आम्ही ग्राहकांच्या सोयीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी वचनबद्ध आहोत. या कठीण परिस्थितीत या नवीन पिक-अप अँड ड्रॉप किंवा फक्त ड्रॉप सेवेमुळे ग्राहकांना त्यांचा फोन खराब झाल्यास घराबाहेर न पडता तो दुरुस्त करून मिळण्याची सुविधा मिळणार आहे. आमचे सर्वत्र पसरलेले सर्व्हिस नेटवर्क आणि कॉन्टॅक्टलेस सेवेचे विविध पर्याय यामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांना अधिक चांगली सुविधा देता येणार आहे.’

First published: April 25, 2021, 11:03 PM IST

ताज्या बातम्या