3 हजारने स्वस्त झाला 5G असलेला ONE PLUS! खास फीचर्ससोबत मिळणार 4 कॅमेरा

3 हजारने स्वस्त झाला 5G असलेला ONE PLUS! खास फीचर्ससोबत मिळणार 4 कॅमेरा

865 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 48 प्रायमरी सेंसर 5G सोबतच 50 GB ग्राहकांना क्लाऊड स्टोरेजही मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 13 सप्टेंबर : OPP आणि सॅमसंगला सगळ्यात कडवी टक्क देणारा वन प्लस मोबाईल. या मोबाईलची सध्या बाजारात तुफान मागणी वाढली आहे. one plus नॉर्डच्या यशस्वी विक्रीनंतर आता कंपनीने आणखीन एका फोनवर सूट दिली आहे. तुम्ही जर वन प्लस घेण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. नुकत्याच आलेल्या वन प्लस 8 मोबाईलवर कंपनीकडून 3000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

5G नेटवर्क असलेला one plus मोबाईल 3 हजार रुपयांनी स्वस्त झाल्याची माहिती अमेझॉन इंडियावर देण्यात आली आहे. 6GB128GB बेसिक फोन 41 हजार 999 रुपये किंमत आहे. त्याऐवजी आता हा फोन 38,999 रुपयांना मिळणार. 8GB128GB मोबाईल 44,999 तर 12 GB128GB 49,999 रुपये किंमत आहे.

हे वाचा-Samsung M31 vs M51 फीचर्सनुसार कोणता मोबाईल आहे बेस्ट?

OnePlus 8 चे फिचर्स काय आहेत जाणून घ्या

या फोनमध्ये ग्राहकांना फुल HD डिस्प्ले स्क्रीन, 865 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 48 प्रायमरी सेंसर 5G सोबतच 50 GB ग्राहकांना क्लाऊड स्टोरेजही मिळणार आहे. 4300 mAh बटरीसह 30 वॅटचा चार्जर देण्यात आला आहे. 22 मिनिटांत 50 टक्के फोन चार्ज होतो असा कंपनीचा दावा आहे. ग्राहकांना हा मोबाईल तीन रंगात उपलब्ध होणार आहे. काळा निळा आणि गुलाबी रंगाचा फोन ग्राहकांना अमेझॉनवर उपलब्ध आहेत.

हे वाचा-Best Camera आणि 6 GB रॅम, स्वस्तात मस्त फीचर्स देणारा Poco M2 लाँच

OnePlus 8 प्रोचे फिचर्स काय आहेत जाणून घ्या

या फोनमध्ये फुल HD डिस्प्ले स्क्रीन, 865 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 48 प्रायमरी सेंसर48 वाईड अँगल कॅमेरा मिळणार आहे. 50 GB ग्राहकांना क्लाऊड स्टोरेजही मिळणार आहे. 4510 mAh बटरीसह 30 वॅटचा चार्जर देण्यात आला आहे. 23 मिनिटांत 50 टक्के फोन चार्ज होतो असा कंपनीचा दावा आहे. ग्राहकांना हा मोबाईल तीन रंगात उपलब्ध होणार आहे. काळा निळा आणि निळसर राखाडी रंगाचा फोन ग्राहकांना अमेझॉनवर उपलब्ध आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 13, 2020, 3:16 PM IST

ताज्या बातम्या