नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध, सॅमसंगची भारतात भली भक्कम गुंतवणूक

नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध, सॅमसंगची भारतात भली भक्कम गुंतवणूक

सॅमसंग भारताला आपल्या जागतिक व्यापाराचं केंद्र बनवतेय. हे काम सुरू करण्यासाठी कंपनी भारतात 2500 कोटी रुपये गुंतवणूक करतेय.

  • Share this:

मुंबई, 05 मे : सॅमसंग भारताला आपल्या जागतिक व्यापाराचं केंद्र बनवतेय. हे काम सुरू करण्यासाठी कंपनी भारतात 2500 कोटी रुपये गुंतवणूक करतेय. सॅमसंग ग्लोबलनं भारतात दोन नवे कंपोनन्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करतेय. सॅमसंग डिस्प्ले कंपनी आणि सॅमसंग एसडीआय इंडिया. ही कंपनी फोन डिस्प्ले आणि बॅटरीचं उत्पादन करणार आहे. सॅमसंगनं भारतात गुंतवणूक केल्यानं इथे नोकरीच्या संधी वाढणार आहेत.

कंपोनन्ट कंपन्यांच्या वतीनं सॅमसंग स्मार्टफोनच्या विक्रेत्यांना फोनचे भाग विकणार. आता हे विक्रेते परदेशी युनिटकडून हे पार्ट्स विकत घेतायत. सरकार मेक इन इंडियावर जोर देतेय. म्हणून परदेशातून येणाऱ्या मोबाइलच्या कंपोनन्टसवर आयात शुल्क वाढवली गेलीय. स्थानिक निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार हे करतंय.

'ही' सरकारी बँक झाली खासगी, आता ग्राहकांना मिळणार बँकिंग आणि विमा सेवा एकाच ठिकाणी

सॅमसंग डिस्प्लेनं उत्तर प्रदेश सरकारबरोबर 1500 कोटी रुपयांच्या प्लांटवर सही केलीय. मोबाइल फोन डिस्प्ले बनवणारा हा प्लान्ट पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये सुरू होईल.

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, आता द्यावी लागेल कमी किंमत

सॅमसंग एसडीआय इंडियाही भारतात लिथियम आयन बॅटरी प्लान्ट सुरू करणार आहे. यासाठी भारतात 900-1000 कोटींची गुंतवणूक केलीय. निवडणुकीनंतर कंपनी केंद्र सरकारशी बोलून याला अंतिम स्वरूप देईल.

देशातल्या दुसऱ्या मोठ्या सरकारी बँकेनं दिला ग्राहकांना झटका, EMI मध्ये झाली वाढ

सॅमसंगनं गेल्या वर्षी भारतात आपल्या सर्वात मोठ्या प्लान्टचं उद्घाटन केलं होतं. तो पुढच्या वर्षी पूर्ण होईल. यासाठी 4 915 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

सॅमसंगनं भारतात इतके प्लान्ट सुरू केल्यामुळे तरुणांना नोकरींच्या संधीही जास्त उपलब्ध होणार आहेत.

VIDEO: अंधेरीतील रहिवासी इमारतीमध्ये आग

First published: May 5, 2019, 5:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading